आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1000 वर्षे जुन्या सोन्याची मूर्तीत दिसला मानवी सापळा, सत्य समजल्यावर शास्त्रज्ञांनाही फुटला घाम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - चीनमध्ये 3 दशकांपूर्वी आढळलेल्या सोन्याच्या 1000 वर्षे जुन्या मूर्तीने शास्त्रज्ञांनाही बुचकळ्यात टाकले आहे. संवर्धनादरम्यान या मूर्तीला शास्त्रज्ञांनी जेव्हा स्कॅन केले, तेव्हा त्यांना अनेक धक्कादायक बाबी दिसून आल्या. त्यांना आत एक ममी दिसली. ही ममी एकदम मूर्तीच्याच आकाराची होती. संशोधानात कळले की, हा एक बौद्ध भिक्षु होते, ज्यांनी उपवासादरम्यान ध्यानाच्याच अवस्थेत प्राणत्याग केला होता.

 

मूर्तीमध्ये आढळली बौद्ध भिक्षूची ममी
1990 मध्ये ही मूर्ती देखभालीसाठी काढण्यात आली होती. परंतु या ममीला स्टॅचूच्या आतून काढण्यात आले नाही, कारण यामुळे ती मोडण्याचा धोका होता. इटली, जर्मनी आणि नेदरलँडच्या शास्त्रज्ञांनी मिळून या मूर्तीवर संशोधन सुरू केल्यावर सिटी स्कॅनमध्ये या मूर्तीत एका व्यक्तीला प्रिझर्व्ह करून ठेवल्याची बाब समोर आली. ही ममी बौद्ध भिक्षुची होती, त्यांची स्किन, मसल्स आणि हाडेही सुरक्षित होे. परंतु एंडोस्कोपीच्या माध्यमातून जेव्हा बौद्ध भिक्षुच्या शरीरातील सॅम्पल घेण्यात आले, तेव्हा कळले की, त्यांचे सर्व अवयव काढून टाकण्यात आले होते. त्यांच्या शरीरात कागद भरून ठेवण्यात आला होता.

 

समाधीदरम्यान स्वत:ला केले ममीफाइड
ही ममी बौद्ध भिक्षु लिकुआन यांची होती, जे चाइनीज मेडिटेशन स्कूलचे मेंबर होते. बौद्ध भिक्षूंच्या काही प्राचीन नोंदींवरून कळले की, बौद्ध भिक्षु मृत्यूपर्यंत उपवास ठेवायचे आणि स्वत:ला स्वेच्छेने ममीमध्ये परिवर्तित करायचे. लिकुआन बौद्ध भिक्षूंमध्ये या प्रकारचा उपवास सुरू करणारे पहिले व्यक्ती होते. त्यांनी उपवासासाठी तब्बल 1200 वर्षांपूर्वी स्वत:ला गुफेत कैद केले होते. आणि प्राणायामाच्या अवस्थेत ध्यानात लीन झाले होते. बौद्ध भिक्षुंना या समाधीअवस्थेतच ममीफाइड करण्यात आले असावे.

 

काय म्हणतात इतिहासकार?
इतिहासकारांच्या मते, बौद्ध भिक्षुंच्या शरीर त्यागानंतर चीनमध्ये त्यांना पूजले जाऊ लागले आणि प्रिझर्व्ह करून ठेवलेल्या शरीराला मॉनेस्ट्रीमध्ये ठेवण्यात आले. 200 वर्षांनंतर जेव्हा त्यांचे ममीफाइड करण्यात आलेले अवशेष खराब होऊ लागले, तेव्हा त्याला सोन्याच्या मूर्तीमध्ये बदलण्यात आले. सध्या ही मूर्ती बुडापेस्टच्या नॅचरल हिस्ट्री म्यूजियममध्ये ठेवण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...