आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियात पाच वर्षांत चौथ्यांदा रासायनिक हल्ला; 80 जणांचा मृत्यू, 1000 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घोऊतातील रुग्णालयात दाखल मुलगा. - Divya Marathi
घोऊतातील रुग्णालयात दाखल मुलगा.

सना- सिरियाच्या पूर्वेकडील घौतामध्ये बंडखोरांच्या ताब्यातील अखेरचे शहर दौमामध्ये झालेल्या संशयित रासायनिक हल्ल्यात ८० जणांचा मृत्यू झाला. १००० हून जास्त जखमी झाले. स्थानिक स्वयंसेवी संस्था हेलमेट्सने हल्ल्यानंतर छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. यामध्ये शनिवारी बेसमेंटमध्ये पडलेले अनेक मृतदेह दिसत आहेत. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. अनेक स्थानिक वैद्यकीय व देखरेख गटांनीही रासायनिक हल्ल्याची माहिती दिली. असे असले तरी त्यांच्या मृतांच्या आकड्यात फरक आहे. 


अमेरिकी धर्मादाय संस्था युनियन मेडिकल स्पेशालिटी हॉस्पिटलने ७० जणांच्या मृत्यूस दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अनेकांच्या तोंडातून फेस निघत असल्याचे दिसत आहे. ही लक्षणे मज्जासंस्था किंवा क्लोरीन वायूच्या जास्त प्रमाणामुळे दिसतात. सिरिया सरकारने हे आरोप फेटाळले आहेत.  ही बातमी खोटी असल्याचा दावा त्या देशाने केला.

 

रासायनिक हल्ला

 सिरियाच्या ‘व्हाइट हेलमेट्स’ या स्वयंसेवी संस्थेने रासायनिक हल्ला झाल्यानंतरचे छायाचित्र प्रसिद्ध केले. यात अनेक मुले मृतावस्थेत दिसली.

 

हेलिकॉप्टरद्वारे बॅरल बॉम्बने वायू टाकला  

घोऊता तील प्रसारमाध्यमांनुसार, हेलिकॉप्टरमध्ये मज्जातंतू एजंट सरीनयुक्त बॅरल बॉम्ब टाकण्यात आला आहे. सरकारी वृत्तसंस्था सनाच्या म्हणण्यानुसार, सिरियाई अरब सेनेला कोणत्या रसायनाची गरज नाही. ही खोटी बातमी दहशतवादी गट जैश-अल-इस्लामने पसरवली आहे. 

 

सिरियात २०१३ मध्ये प्रथम झाला होता रासायनिक हल्ला

 

सरीन मज्जातंतू एजंटचा वापर सिरियात याआधीही झाला आहे. २०१३ मध्ये सिरियाई लष्कराने पूर्व घौतामध्ये अग्निबाणाद्वारे सरीन एजन्ट सोडले होते. यामध्ये १०० हून जास्त लोक मारले गेले होते. सिरियाई लष्कराने एप्रिल २०१७ मध्ये खान शेखाऊनमध्ये रासायनिक शस्त्राचा वापर केला होता. यामध्ये ८० जण ठार झाले होते. या वर्षीच्या सुरुवातीसही सिरिया लष्कराने बंडखोराविरुद्ध विषारी वायूचा वापर केला होता.  

 

अमेरिका : या हल्ल्यासाठी असद व रशिया जबाबदार  

अमेरिकी परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, आम्ही खूप अस्वस्थ करणारे वृत्तांत पाहिले आहेत. या मृत्यूसाठी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असदचे लष्कर व समर्थक जबाबदार आहेत. सरीन मज्जातंतू एजंटाचा वापर सिरियात याआधीही झाला आहे. रासायनिक हल्ल्यात सिरियाई लोकांना ठार करण्यात रशियाही जबाबदार आहे. हा हल्ला सिरियात शांतता कायम राखवण्याच्या रशियाच्या आश्वासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करते. याअंतर्गत रशिया बशर अल-असदचा बचाव करत आहे.  

 

 

सात वर्षांत चार लाखांहून जास्त लोकांचा सिरियात मृत्यू  

२०११ मध्ये एका किरकोळ घटनेतून सिरियात यादवी सुरू झाली. २०११ पासून २०१२ पर्यंत ठिकठिकाणी आत्मघाती बॉम्बस्फोट झाले. आयएसने अनेक ठिकाणांवर ताबा मिळवला. २०१५ मध्ये रशियाने राष्ट्राध्यक्ष बशर अल- असदला पाठिंबा दिला आहे. अमेरिका असदविरोधातील बंडखोरांना मदत करत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सिरियात आतापर्यंत ४ लाखांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...