आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंटरनॅशनल डेस्क - नॉर्थ कोरियन लीडर किम जोन्ग उनने साऊथ कोरियाच्या भूमीवर पाऊल ठेवून शुक्रवारी नवा इतिहास रचला. 65 वर्षांनंतर एखादा नॉर्थ कोरियन नेता येथे पोहोचला. परंतु या दोन शत्रू देशांमध्ये मैत्रीची सुरुवात झाली तरी कशी हा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. या दोन्ही देशांना एकत्र आणण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका एका महिलेने पार पाडली आहे. आणि ती दुसरी कोणी नाही, तर हुकूमशहा किम जोंग उनची बहीण यो जोन्ग आहे. ती त्याची सर्वात विश्वासू म्हणून ओळखली जाते.
कशी जवळ आली दोन्ही शत्रुराष्ट्रे?
- यो जोंग या नॉर्थ कोरियाच्या 9 सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळात सहभागी आहेत. त्या पक्षाच्या प्रचार प्रसार विभागाच्या डायरेक्टरही आहेत.
- याच वर्षी फेब्रुवारीत झालेल्या पियोंगचांग विंटर ओलिम्पिकमध्ये त्या देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी साऊथ कोरियातही गेल्या होत्या.
- या दौऱ्यानंतर त्या नॉर्थ कोरियाच्या फर्स्ट फॅमिलीच्या अशा पहिल्या सदस्या ठरल्या, ज्यांनी शत्रूराष्ट्र साऊथ कोरियाचा दौरा केला.
- त्या ओलिम्पिकची ओपनिंग सेरेमनी अटेंड करण्यासाठी पोहोचल्या होत्या, यात 22 नॉर्थ कोरियन अॅथलीट्सनी आपले सर्वात कडवे स्पर्धक साउथ कोरियाच्या अॅथलीट्ससोबत मार्च केला होता.
- यो जोंग या सेऊलमध्ये 3 दिवस राहिल्या. येथे त्यांनी राष्ट्राध्यक्षांचे ऑफिशियल रेसिडेन्स ब्लू हाऊसमध्ये लंच केला आणि नंतर दोघांमध्ये अनेक तास चर्चाही झाली होती.
- यो यांच्या भेटीनंतरच साऊथ कोरियाचे एक डेलिगेशन नॉर्थ कोरियाला गेले होते. येथे डेलिगेशनने तानाशाह किम जोन्ग उनची भेट घेतली होती.
- यानंतर नॉर्थ कोरियाच्या सेंट्रल न्यूज एजन्सीने म्हटले होते की, या भेटीत किमने जोर देत म्हटले आहे की, दोन्ही देशांना पुन्हा एकत्र आणून त्यांना नवा इतिहास रचायचा आहे.
- दुसरीकडे, डेलिगेशनने देशात परतल्यानंतर सांगितले होते की, हुकूमशहा एप्रिलमध्ये दोन्ही देशांमध्ये एक शिखर संमेलन ठेवण्यावर राजी झाला आहे.
युनिव्हर्सिटीमध्ये वेगळाच होता रूबाब
- नॉर्थ कोरियातून पळून आलेल्या एका डिफेक्टरने एका इंटरव्ह्यूदरम्यान सांगितले की, युनिव्हर्सिटीत शिक्षणादरम्यान किम यो-जोंगचा रूबाब वेगळाच होता.
- हॉलमधून निघताना सर्व विद्यार्थी तिच्यासाठी वाट करून द्यायचे. क्लासमेट्सशिवाय एलिव्हेटरमध्ये इतर कुणीही तिच्यासोबत जाऊ शकत नव्हते.
- त्याच्या मते, किम यो-जोंगचे लग्न आर्मी चीफ चो योंग-हे यांच्या मुलाशी झाले होते. परंतु, जानेवारी 2013 मध्ये त्यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला.
ओळख लपवण्यासाठी विदेशात दुसऱ्या नावाने घेतले होते शिक्षण
- स्वित्झर्लंडच्या एका शाळेत किम यो जोंगने शिक्षण घेतले आहे. भावाप्रमाणेच त्यांचे खोटे नाव शाळेत नोंदलेले होते. शाळेत असे सांगण्यात आले होते की, ही किम जोंगच्या नोकराची मुलगी आहे.
- मायदेशी परतल्यावर त्यांनी सीनियर सेकंडरी उत्तर कोरियात केली. यानंतर त्यांनी किम इल सुंग मिलिटरी युनिव्हर्सिटीत शिक्षण घेतले. किम यो जोंग यांना इंग्रजी आणि जर्मन भाषाही चांगली अवगत आहे.
- किम यो-जोंग पहिल्यांदा 2010 मध्ये वडिलांसोबत वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या तिसऱ्या संमेलनात दिसली होती. यानंतर 3 वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कार होताना दिसल्या.
- सूत्रांनुसार, सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत शासक किम जोंगचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. लोकांना वाटले की, तो आजारी आहे. त्याचेच काम पाहण्यासाठी किम यो जोंगला सार्वजनिकरीत्या सर्वांसमोर यावे लागले.
काय करतात यो-जोंग?
- यो-जोंग यांना 7th काँग्रेस समिटमध्ये नॉर्थ कोरियाच्या केंद्रीय समितीत निवडण्यात आले होते. साऊथ कोरियन न्यूजपेपर 'द चोशुन'नुसार, यो-जोंग आपल्या भावासाठी अपॉइंटमेंट्स, प्रमोशन आणि प्रचार-प्रसाराचे काम पाहतात.
- सूत्रांनुसार, यो-जोंग यांनीच अमेरिकन प्रोफेशनल बास्केटबॉल प्लेयर डेनिस रोडमन आणि आपल्या भावात मैत्री घडवली होती. यानंतर रोडमन नॉर्थ कोरियाच्या दौऱ्यावर गेला होता.
- आताही किम यो-जोंग या मीडियासमोर खूप कमी येतात. परंतु नॉर्थ कोरियामध्ये त्यांचीच चलती आहे. असे म्हणतात की, किम जोंग कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या बहिणीला- यो जोंगचा सल्ला विचारतो.
- किम यो-जोंगचे लग्न आर्मी चीफ चो योंग-हे यांच्या मुलाशी झाले होते, परंतु जानेवारी 2013 मध्ये त्यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, हुकूमशहासोबत साऊथ कोरिया दौऱ्यादरम्यानचे त्यांचे फोटोज...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.