आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत चक्रीवादळाने हाहाकार: 6 जणांचा मृत्यू, वीज आणि वाहतूक सेवा कोलमडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - अमेरिकेच्या उत्तर-पूर्वीकडे समुद्र किनाऱ्यांवर आलेल्या चक्रीवादाळाने हाहाकार माजला आहे. या वादळात आतापर्यंत किमान 6 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच 7 लाख नागरिकांना या फटका बसला आहे. अनेक शहरांमध्ये ताशी 113 किमीने वारे वाहत आहेत. तसेच अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याने अंधकार पसरला आहे. खराब हवामानामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव तब्बल 3000 फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी रेल्वे आणि सबवे सेवा सुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. येत्या काही तासांत परिस्थिती आणखी वाइट होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 
 
- अमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, वारे इतक्या वेगाने वाहत आहेत की झाड सुद्धा उखडून पडत असल्याचे चित्र आहे. सद्यस्थितीला 7 लाख नागरिक पायाभूत सुविधांपासून वंचित झाले आहेत.
- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बोस्टनसह काही शहरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वांना सुरक्षित स्थळी किंवा आहे त्या ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 
- पोलिसांनी सांगितले, की या चक्रीवादळात आतापर्यंत 6 जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये 2 लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यापैकी एकाचे 11 वर्षे होते. 
- व्हर्जिनियाचे गव्हर्नर राल्फ नॉर्दम यांनी शुक्रवारी दुपारपासूनच प्रांतात नैसर्गिक संकट पाहता आपातकाल जाहीर केला आहे. 
- केवळ सामान्य नागरिकच नव्हे, तर या वादळाचा फटका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही बसला आहे. खराब वातावरणामुळे ट्रम्प यांना वॉशिंग्टनमध्येच राहावे लागले. तसेच त्यांचे सर्व दौरे रद्द झाले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...