आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत लावण्यात आले स्मार्ट ट्री; अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - हा नजारा दुबईच्या बीचवरचा आहे. या ठिकाणी खरीखुरी नव्हे, तर डिजिटल आणि स्मार्ट झाडे लावण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट ट्री चालवण्यासाठी काही विजेची गरजच नाही. ते सोलार एनर्जीवर चार्ज होऊन चालतात. बीचवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रत्येकाला या स्मार्ट ट्रीच्या माध्यमातून मोफत वाय-फाय इंटरनेट मिळत आहे. 

 

इंफ्रारेड कॅमेऱ्यासह या सुविधा...
- येथे वाय-फाय हॉटस्पॉटच्या माध्यमातून लोकांना कनेक्ट केले जाणार आहे. प्रत्येक झाडावर 360 डिग्री कॅमेरा आणि एमरजेंसी बटन लावण्यात आले आहे.
- प्रत्येक स्मार्ट ट्रीवर फास्ट चार्जिंग पॉइंट लावण्यात आले आहेत. झाडाच्या 100 मीटर परिसरापर्यंत वायफाय इंटरनेटची रेंज आहे.
- या झाडांची लांबी 20 फुट आणि पानांचा आकार 18 चौरस मीटर आहे. फक्त दिवसा चार्ज होऊन ते रात्रभर चालणार आहेत. 
- एवढेच नव्हे, तर या झाडांवर स्क्रीन देखील लावण्यात आल्या आहेत. त्यावर दुबईशी संबंधित माहिती पर्यटकांना दिली जात आहे. 
- आतापर्यंत अशा प्रकारची झाडे 50 ठिकाणी लावण्यात आली आहेत. दुबईत एकूणच 103 ठिकाणी स्मार्ट ट्री लावण्याची तयारी सुरू आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या स्मार्ट ट्रीचे आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...