आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील शरणार्थींच्या वेदना, चार महिन्यांनी भेटलेल्या आईला ओळखायलाही तयार नाहीत मुले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- मिल्का पाब्लो तिच्या 3 वर्षांची मुलगी डार्लीला 4 महीन्यांनी भेटली. यावेळी मुलीने आईला ओळखायला नकार दिला.

- कॅलिफोर्नियाच्या कोर्टाने मुले आई वडिलांकडे सोपवण्याचा आदेश दिला आहे. अनेक मुले समाजसेवकांकडे राहण्याचा हट्ट करत होते. 

 

फिनिक्स - बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेत राहणाऱ्या शरणार्थिना कॅलिफोर्नियाच्या कोर्टाच्या आदेशानंतर त्यांच्या मुलांना भेटू दिले जात आहे. पण यातील अनेक मुले आता आई वडिलांना ओळखायला तयारच नाही. ही मुले आतापर्यंत शिबिरात ज्या समाजसेवकांकडे राहिले त्यांच्यासोबत राहण्याचा हट्ट करत आहेत. चार महिन्यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केल्याच्या आरोपावरून 2000 मुलांना कुटंबांपासून वेगळे केले होते. 

 

मिर्सी अल्बा लोपेज (31) म्हणाली, माझा तीन वर्षांचा मुलगा चार महिन्यांनी माझ्या कुशीत आला. पण तो मला ओळखूच शकला नाही आणि रडू लागला. कोर्टातही तो समाजसेविकेकडे जाण्याचा हट्ट करत होता. अशीच अवस्था मिल्का पाब्लो (35) ची आहे. रडत तिने सांगितले की, माझी 3 वर्षांची मुलगी डार्ली मला पाहून प्रचंड घाबरली. माझ्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करू लागली. ती जोरात ओलडत होती आणि शिबिरात राहणाऱ्या महिलेला आवाज देत होती. 


शरणार्थींना परिधान करावे लागेल डिव्हाइस 
कोर्टाच्या निर्णयावर आता सरकारही राजी झाले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेकायदेशीर रित्या अमेरिकेत राहणाऱ्या शरणार्थींना पोलिसांकडे नोंदणी करावी लागेल. त्यांच्या पायात परिधान करण्यासाठी एक डिव्हाइस दिले जाईल. त्यामुळे पोलिसांना त्यांच्यावर नजर ठेवणे शक्य होईल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...