आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SpaceX आज लाँच करणार जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट, त्यात पाठवणार अॅलन मस्कची कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाचणीसाठी हे रॉकेट फ्लोरिडाच्या कॅनडी स्पेस सेंटरहून भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशीरा 12:00 वाजता लाँच केले जाईल. - Divya Marathi
चाचणीसाठी हे रॉकेट फ्लोरिडाच्या कॅनडी स्पेस सेंटरहून भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री उशीरा 12:00 वाजता लाँच केले जाईल.

मियामी - अमेरिकेची प्रायव्हेट स्पेस कंपनी स्पेसएक्स मंगळवारी फॉल्कन हेवी रॉकेट अंतराळात पाठवणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे आतापर्यंतचे सर्वात शक्तीशाली रॉकेट आहे. यामुळे आगामी काळामध्ये लोकांना चंद्र आणि मंगळावर पाठवता येऊ शकेल. सध्या यात फ्युचर स्पेस सूट परिधान केलाला एक पुतळा आणि कंपनीचा मालक अॅलन मस्क यांची चेरी रेड कलरची टेस्ला कार पाठवली जात आहे. 


एवढे शक्तीशाली आहे रॉकेट 
इंजिन : 27 मर्लिन 1D
लांबी : 70
वजन : 63.8 टन (दोन स्पेस शटल एवढी)
वजन वाहून नेण्याची क्षमता : 64 टन
एकूण शक्ती : 50 लाख टन  (18 एअरक्राफ्ट-747 एवढी)


असा करेल प्रवास
- टेस्टींगसाठी हे रॉकेट फ्लोरिडाच्या कॅनेडी स्पेस सेंटरमधून भारतीय वेळेनुसार रात्री 12 वाजता लाँच केले जाईल. 
- पृथ्वीच्या कक्षेतून हे रॉकेट मंगळाच्या कक्षेच्या भोवती चकरा मारेल. 
- अॅलन मस्क यांच्या मते अंतराळात सेकंदाला 11 किमी एवढा याचा वेग असेल. 


तयार केले आहे दोनदा तयार होणारे रॉकेट 
- स्पेसएक्स कंपनीने यापूर्वी दोनदा वापर होणाऱ्या रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे. 
- कंपनीने दावा केला आहे की, दोनवेळा वापर होणाऱ्या रॉकेटपेक्षा या रॉकेटच्या लाँचिंगमध्ये कमी खर्च लागणार आहे. 


इतर देशांना मिळालेले नाही यश 
- रशिया, जपान आणि युरोपियन स्पेस एजन्सीदेखिल या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. पण सध्या सर्वांची चाचणीच सुरू आहे. 
- स्पेसमध्ये कोणतेही सॅटेलाईट पाठवण्यासाठी रॉकेटचा वापर केला जातो. कोणत्याही प्रोग्राममधील एक मोठी रक्कम रॉकेटसाठीच खर्च केली जाते. स्पेसएक्स अनेक दिवसांपासून अशा रॉकेटवर संशोझन करत होती जे एकापेक्षा जास्तवेळा वापरता येईल. हा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...