आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक दिव्याच्या 8 दिवसांपूर्वीच्या भांडणातून श्रीलंकेमध्ये आणीबाणी !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलंबो- श्रीलंकेच्या कँडी शहरात बौद्ध व अल्पसंख्यांक मुस्लिम यांच्यात सांप्रदायिक हिंसाचार भडकला. त्यानंतर वाढलेल्या तणावामुळे सरकारने मंगळवारी संपूर्ण देशात १० दिवसांसाठी आणीबाणी लागू केली आहे. श्रीलंकेत यापूर्वी ऑगस्ट २०११ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 


गेल्या काही दिवसांतील काही घटनांना या आणीबाणीचे कारण मानले जात आहे. परंतु २७ फेब्रुवारी रोजी श्रीलंकेच्या पूर्वेकडील अंपारा प्रांतातील हिंसाचार घडून आला होता. येथे वाहतुकीच्या लाल दिव्यावरून झालेल्या भांडणानंतर मुस्लिम समुदायाच्या काही लोकांनी बौद्ध समाजाच्या तरूणाला बेदम मारहाण केली. तेव्हापासून या भागात तणाव होता. त्याशिवाय कँडी जिल्ह्यात थेल्डेनियामध्ये सोमवारी एका बाैद्ध व्यक्तीच्या मृत्यूनंतर एका मुस्लिम व्यापाऱ्याला पेटवून देण्यात आले होते. त्यानंतर सिंहली बौद्ध व अल्पसंख्यांक मुस्लिम समुदायात हिंसाचार घडून आला. परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली होती, असे श्रीलंकेच्या प्रसार माध्यमांचे म्हणणे आहे. वास्तविक कँडी जिल्ह्यात रविवारी देखील हिंसाचार घडून आला होता, असा पोलिसांचा दावा आहे. श्रीलंकेत सात वर्षांमधील ही दुसरी आणीबाणी आहे. २००९ मध्ये तमिळी बंडखोराच्या खात्म्यानंतर २०११ मध्ये आणीबाणी लावण्यात आली होती.

 

बौद्ध संघटनांना मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर आक्षेप
श्रीलंकेत मांसाहार व पाळीव पशुंना मारण्याचा मुद्दा बौद्ध तसेच मुस्लिम समुदायातील वादाचे एक कारण आहे. कट्टरवादी बौद्ध संघटना बोदू बाला सेना सिंहली बौद्धांची राष्ट्रवादी संघटना आहे. ही संघटना मुस्लिमांच्या विरोधात आंदोलन करते. या संघटनेने मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येला विरोध केला आहे.


रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय देण्यास वाढता विरोध
 बौद्ध समुदायाच्या लोकांनी केलेल्या आरोपात मुस्लिम त्यांचे धर्मांतर करत असून बौद्धांच्या प्राचीन स्थळांची मोडतोड करत आहेत. रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय दिला जात आहे. मुस्लिम समुदायाचा आरोप आहे की, बौद्ध दंगेखोरांनी १० मशिदी, ७५ दुकाने व ३२ घरांची तोडफोड करून आग लावली आहे.

 

कारण - सिंहली बौद्ध मुस्लिमांना धोकादायक समजतात

श्रीलंका सरकार तामिळी बंडखोरांचा मुकाबला करण्यात भलेही यशस्वी ठरले असेल. परंतु देशातील सिंहली बौद्ध हा एक मोठा वर्ग आहे. हा वर्ग गैरसिंहली वंशाचे लोक व मुस्लिमांकडे आपल्यासाठी धोकादायक असल्याच्या नजरेने पाहतो. २०१४ मध्ये श्रीलंकेत मोठी दंगल उसळली होती. तेव्हा हिंसाचारात ८ हजारावर मुस्लिमांना स्थलांतरित व्हावे लागले होते.

 

आरोप - मुस्लिम संघटना बौद्धांचे धर्मपरिवर्तन करते
श्रीलंकेत बौद्ध समुदायाने मुस्लिम संस्था-संघटनांवर धर्मपरिवर्तनाचे आरोप केले आहेत. काही बौद्ध संघटना रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय देण्याच्या निर्णयाला विरोध करत आहेत. बौद्ध सिंहलींच्या मते, रोहिंग्या मुस्लिमांनी म्यानमारमध्ये त्यांच्या समुदायाच्या लोकांवर अत्याचार केले व त्रास दिला.

 

श्रीलंकेहून भास्कर लाइव्ह; राजकीय संरक्षणातून श्रीलंकेत पसरतोय सुनियोजित हिंसाचार

 

श्रीलंकेत वाहतूक दिव्यावरून सुरू झालेल्या वादाने हिंस्र रूप धारण केले आहे. यामध्ये राजकारणाचा वास येत आहे. येथे मुस्लिम व बौद्धांमध्ये तणावपूर्ण स्थिती असते. दहा दिवसांपूर्वी कँडी जिल्ह्याच्या दिगाना व तेलदेनियाच्या मुस्लिमबहुल भागात मुस्लिम व बौद्ध गटांमध्ये वाद झाला होता. यानंतर आलेल्या पाचशेपेक्षा जास्त समाजकंटकांनी, ज्यात बौद्धांचाही समावेश होता, त्यांनी िहंसाचार केला. मुस्लिमांची दुकाने व मशिदींना निशाणा करण्यात आले. तोडफोड केली. असे असले तरी या हिंसाचाराचा म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांशी संबंध नाही. बौद्धांच्या वर्चस्वाचे हे प्रकरण आहे. राजकीय संरक्षणामुळे वेळेत हिंसाचार रोखण्यात आला नाही. परिस्थिती विकोपाला गेल्यानंतर पोलिसांनी अटकसत्र सुरू केले. सुरुवातीस ४ मुस्लिमांना अटक केली. यानंतर ३३ पेक्षा जास्त बौद्ध व सिंहलींना अटक केली. सरकार सतर्क राहिले असते तर देशभरात आणीबाणी लागू करण्याची गरज राहिली नसती. आता हा तणाव अन्यत्र वळला आहे. अशात सरकारला नाइलाजास्तव पाऊल उचलावे लागले. तसे न केल्यास पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत अडचण येऊ शकते.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...