आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीच्या पार्थिवाची का झाली फॉरेन्सिक चाचणी, का होतोय विलंब; येथे जाणून घ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुमेरा अमिरात हॉटेलमधील एक बाथरूम... - Divya Marathi
जुमेरा अमिरात हॉटेलमधील एक बाथरूम...

इंटरनॅशनल डेस्क - बॉलिवुडची मिस हवा-हवाई आणि चांदणी नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्रीदेवी शनिवारी अचानक जगाचा निरोप घेतला. तिच्या निधनाचे वृत्त जवळच्या लोकांसोबतच साऱ्या जगासाठी आश्चर्याचा मोठा धक्का आहे. दुबईत तिचे निधन झाल्यानंतर उद्योजक अंबानी यांनी आपले प्रायव्हेट जेट पाठवून पार्थिव मुंबईला आणण्याची व्यवस्था केली. दुबईत श्रीदेवीच्या पार्थिवाचे पोस्ट मॉर्टम करण्यात आले. यानंतर पोलिसांकडून न्यायवैद्यक तपासणी सुद्धा करण्यात आली. यानंतर पार्थिव मुंबईला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली.

 

भारतात आरोग्य संबंधित समस्यांमुळे मृत्यू झाल्यानंतर पोस्टमॉर्टमची आवश्यकता नसते. पण, दुबईत तसे नाही. त्यामुळे, श्रीदेवीच्या पार्थिवाच्या पोस्टमॉर्टमसह फॉरेन्सिक चाचणी का घेतली ते आम्ही आपल्याला सांगत आहोत. 

 

अशी आहे प्रक्रिया

- दुबईत कुठल्याही परदेशी नागरिकाचा मृत्यू झाल्यास त्यांचे शवविच्छेदन केले जाते. आजारपणाने मृत्यू झाल्यानंतरही ते आवश्यक आहे.

- यानंतर फॉरेन्सिक अहवाल जारी केला जातो आणि शवाच्या Embalming ची प्रक्रिया सुरू होते. पोस्टमॉर्टम झालेले पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यापूर्वी त्यावर जी केमिकल आणि नेटकेपणाची प्रक्रिया केली जाते त्यालाच Embalming असे म्हटले जाते.

- या प्रक्रियेसाठी किमान 90 मिनिटांचा वेळ लागतो. त्यानंतर पार्थिव पोलिसांकडे नेले जाते. पोलिस फॉरेन्सिक अहवाल घेऊन डेथ सर्टिफिकेट जारी करतात.

- यानंतर पार्थिव प्रशासन आणि मृतकाच्या दूतावाकडे पाठवले जाते. इमिग्रेशन विभागात पासपोर्ट, व्हिसा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होते. 

- मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्याची प्रशासनाकडून अधिकृत परवानगी काढावी लागते. त्यानंतर मृतदेह त्या देशाकडे रवाना केले जाते.

 

आणखी सविस्तर माहितीसाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...