आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताशी 75 किमी वेगाने धावपट्टीवर धावले स्ट्रॅटोलाँच, 2019 मध्ये प्रथम उड्डाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- जगातील सर्वात मोठे विमान स्ट्रॅटोलाँचची धावपट्टीवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. ही चाचणी कॅलिफोर्नियातील मोझेव एअर अँड स्पेस पोर्टवर घेण्यात आली. याचबरोबर विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विमान २०१९ मध्ये पहिले उड्डाण करेल. अंतराळात रॉकेट नेण्याचे काम करणार आहे. २४ तासांत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात  साधनसामग्री पोहोचवेल. सध्याच्या अंतराळ मोहिमेपेक्षा ही कमी खर्चीक आहे. या विमानाच्या विंगस्पॅनची लांबी ३७५, तर रुंदी १२.५ फूट आहे. मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलेन या प्रकल्पात कार्यरत आहेत.

 

विमानास २८ चाके, ६ इंजिन , २ कॉकपिट

- विमानास २८ चाके, ६ इंजिन आणि २  कॉकपिट आहेत. विमानाच्या कॉकपिटमध्ये ३ केबिन क्रूसाठी जागा
- विमानास एकूण ६ इंजिन असून प्रत्येक इंजिनाचे वजन ४ हजार  किलो आहे.
- या विमानाद्वारे रॉकेट लाँच करतेवेळी कमी वेळ लागावा, असा उद्देश आहे.
-  हे विमान ५० हजार फूट उंचीवरून उड्डाण  करण्यास सक्षम आहे.
- २०११ मध्ये हा प्रकल्प सुरू झाला. तेव्हा याचा खर्च २०  हजार कोटी रुपये होता.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, ह्यूज-एच सध्या सर्वात माेठे विमान...

बातम्या आणखी आहेत...