आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूलच्या शिया कल्चरल सेंटरवर आत्मघातली हल्ला, 40 जण ठार, 30 हून अधिक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेमध्ये काबूलमध्ये इंडियन अँबेसीजवळ हल्ला करण्यात आला होता. त्यात जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला होता.-फाइल - Divya Marathi
मेमध्ये काबूलमध्ये इंडियन अँबेसीजवळ हल्ला करण्यात आला होता. त्यात जवळपास 90 जणांचा मृत्यू झाला होता.-फाइल

काबूल - येथील पश्चिम परिसरातील शिया कल्चरल अँड रिलीजियस ऑर्गनायझेशनवर एक आत्मघातली हल्ला झाल्याची बातमी आहे. त्यात किमान 40 लोक मारले गेल्याची आणि 30 जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी गटाने घेतलेली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्यांनी सांगितले की, मृतांची संख्या अधिक वाढली आहे. स्थानिक माध्यमांच्या मते, कार्यक्रमाच्या कार्यालयात मीडिया ग्रुपचे सदस्य चर्चा करत असताना हा हल्ला झाला. 

 

- स्थानिक तोलो न्यूजने परराष्ट्र मंत्रालयाच्या हवाल्याने 40 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 30 जण जखमी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 
- अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या मते, मारल्या गेलेल्यांमध्ये बहुतांश महिला, मुले आणि पत्रकारांचा समावेश आहे. 

 

एकाच कुटुंबातील तीन ठार 
- तोला न्यूजनुसार, या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबीय सध्या आप्तेष्ठांचा शोध घेत आहेत. 
- प्रेसिडेंट अशरफ गनी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून हा मानवते विरोधातील गुन्हा असल्याचे म्हटले आहे. 

 

मेमध्ये झालेल्या हल्ल्यात मारले गेले होते 90 जण 
- याचवर्षी मे महिन्यात काबूलमधील भारतीय दुतावासाजवळही हल्ला झाला होता. त्यात जवळपास 90 जण ठार झाले होते. 300 हून अधिक जखमी झाले होते. 


जुलैत कार ब्लास्टमध्ये झाले होते 24 ठार 
- गुलाई दावा खाना परिसरात 24 जुलै ला आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात 24 जण ठार झाले होते. तर 42 जखमी झाले होते. 


गेल्यावर्षी सर्वाधिक हानी 
- यूएन असिस्टंस मिशन इन अफगानिस्तान (UNAMA) च्या रिपोर्टनुसार गेल्यावर्षी अफगाणिस्तानात हल्ल्यांमध्ये 3498 लोकांचा मृत्यू झाला होता. 7920 जण जखमी झाले होते. म्हणजे एकूण 11418 जणांची हानी झाली. गेल्या आठ वर्षांतील हा सर्वाधिक आकडा आहे. 2015 च्या तुलनेत यात 2% वाढ झाली होती. 
- UNAMA च्या रिपोर्टनुसार यावर्षी मार्चपर्यंत अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राइक आणि दहशतवादी हलल्यात 715 जणांचा मृत्यू झाला होता.  1466 जण जखमी झाले होते. 


अमेरिकन सैन्य आल्यानंतर वाढल्या अडचणी  
- दहशतवादाच्या विरोधातील लढाईत अमेरिका आणि विदेशी सैन्य अफगाणिस्तानची मदत करत आहे. 
- सध्या येथे 8400 अमेरिकन सैनिक आणि 5000 नाटो सैनिक आहेत. त्यांचे मुख्य काम सल्लागार म्हणून काम करणे असे आहे. 
- सहा वर्षांपूर्वीपर्यंत येथे एक लाखांहून अधिक अमेरिकन सैनिक होते. 2011 ते 2013 पासून अमेरिकन लष्कर आल्यापासून येथील हल्ल्यांत वाढ झाली आहे.  

बातम्या आणखी आहेत...