आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल : आत्मघातकी स्फोटात 25 ठार, 18 जखमी; पारशी नववर्षाच्या उत्सवावर विरजण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - पारशी नववर्षाच्या आनंदामध्ये असलेल्या नागरिकांना स्फोटाने हादरवून सोडण्याचा प्रकार काबूलमध्ये घडला आहे. अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या या आत्मघातकी स्फोटात 26 नागरिक ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तर 18 जखमी असल्याचेही समोर आले आहे. अफगाणिस्तानच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  


बुधवारी शहरामध्ये पर्शियन नववर्षाचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो नागरिक जमलेले होते. विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पर्शियन नववर्ष म्हणजे नवरुजच्या निमित्ताने सुटी अशल्याने लोकांची गर्दी अधिक होती. याचाच फायदा घेत आत्मघातली स्फोट घडवण्यात आला. विशेष म्हणजे काबूलच्या पश्चिम भागात असलेल्या एका मशिदीजवळ हा स्फोट झाल्याने अधिक लोकांना दुखापत झाल्याचे समोर आले आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...