आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भारतीय विद्यार्थी शरत कोप्पूचा खून करणारा आरोपी पोलिस Encounter मध्ये ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेतील कान्सास प्रांतात भारतीय विद्यार्थी शरत कोप्पूच्या हत्येचा आरोपी ठार मारला गेला आहे. पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार, कान्सास येथील एका हॉटेलात एक संशयित आरोपी दबा धरून बसल्याची माहिती मिळाली होती. पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपीने गोळीबार केला. यानंतर सुरू झालेल्या चकमकीत पोलिसांनी त्याला ठार मारले. या चकमकीत 3 पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. 


6 जुलै रोजी झाली शरतची हत्या
- शरत ज्या हॉटेलात काम करत होता त्या ठिकाणी 6 जुलै रोजी दरोडा पडला होता. दरोड्याच्या वेळी सगळेच जमनीवर झोपले होते. परंतु, शरतने मागच्या दाराने निघण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी आरोपींनी त्याची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी शरतच्या हत्येचा व्हिडिओ सार्वजनिक केला होता. तसेच गेल्या आठवडाभरापासून खूनीचा शोध घेत होते. 
- त्याच दरम्यान रविवारी पोलिसांना आरोपीचा सुगावा मिळाला. पोलिस अधिकारी संशयिताला अटक करण्यासाठीच हॉटेलात गेले होते. परंतु, त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. परिणामी चकमक उडाली आणि आरोपी ठार मारला गेला. ठार झालेल्या संशयित आरोपीचे नाव पोलिसांनी जाहीर केले नाही. 

बातम्या आणखी आहेत...