आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • नोबेल अकॅडमीला सेक्स स्कँडलचे गालबोट, 70 वर्षांनी पहिल्यांदा यंदा साहित्याचे नोबेल नाही Swedish Academy Says 2018 Nobel Literature Prize Postponed

69 वर्षांत प्रथमच यंदा साहित्याचे नोबेल दिले जाणार नाही, सेक्‍स स्‍कँडलचे गालबोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाराेपी जीन व पत्नी. - Divya Marathi
अाराेपी जीन व पत्नी.

स्टॉकहोम - यंदा साहित्याचा नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही. ज्युरी सदस्याचा पती लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आरोपी असल्याने हा निर्णय घेण्यात आला. फ्रेंच फोटोग्राफर जीन क्लाऊड अरनॉल्टवर मी-टू कॅम्पेनमध्ये १८ महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप झाला होता. त्या वेळी जीनची पत्नी कवयित्री फ्रोस्टेन्सन स्वीडिश अकादमीची ज्युरी सदस्य होती.

 

जीनने फ्राेस्टेन्सनच्या संपर्काचा फायदा उचलून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. प्रकरण उघडकीस आल्यानंतर फ्रोस्टेन्सन यांना पदावरून हटवले होते. अकादमीने नैतिक जबाबदारी स्वीकारत सांगितले, पुरस्कारांची घोषणा करणे शक्य नाही. यामुळे २०१८ चे साहित्याचे नोबेल २०१९ मध्येच दिले जाईल.


सचिव ओल्सन म्हणाले, लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे संस्थेच्या प्रतिमेला तडा गेला. ६९ वर्षांत प्रथमच नाेबेल पुरस्कार लांबणीवर टाकण्यात  अाला आहे. याआधी १९४९ चे साहित्याचे नोबेल विल्यम फॉकनर यांना १९५० मध्ये बर्ट्रांड रसेल यांच्यासोबत देण्यात आले होते.  यंदा साहित्याचे नोबेल देण्यात एक तांत्रिक पेचही आहे. पुरस्कार समिती म्हणजे ज्युरीत एकूण १२ सदस्य असतात. मात्र फ्रोस्टेन्सन यांच्या राजीनाम्यामुळे ११ सदस्य उरले आहेत. पूर्ण सदस्य संख्येविना पुरस्कार देता येत नाही. नोबेलच्या नियमांनुसार ज्युरी सदस्यपदी निवडलेल्या व्यक्तीला तहहयात त्या पदावर राहावे लागते. ती राजीनामा देऊ शकत नाही. तथापि, अकादमी तिला हटवू शकते. स्वीडिश अकादमीच्या स्थायी सदस्या सारा डॅनियस म्हणाल्या, आरोपांनंतर अकादमीने फ्रोस्टेन्सन व त्यांच्या पतीशी संबंध तोडले आहेत. 

 

११७ वर्षांत आठव्यांदा साहित्याचे नाेबेल दिले जाणार नाही
१९०१ मध्ये सुरू झालेल्या नोबेल पुरस्कारांच्या ११७ वर्षांच्या इतिहासात ११० वेळा साहित्याचे नोबेल देण्यात आलेले आहे. यंदा आठव्यांदा हा पुरस्कार कुणालाही दिला जाणार नाही. १९१४, १९१८, १९३५, १९४०, १९४१, १९४२ व १९४३ मध्ये साहित्याचे नोबेल कुणालाही दिले गेले नव्हते. १९१४ मध्ये पहिल्या जागतिक महायुद्धाने निर्माण झालेली परिस्थिती तसेच १९३५ मध्ये कुणीच उमेदवार नसल्याने पुरस्कार टाळण्यात आला होता.

 

बातम्या आणखी आहेत...