आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकीचा अलार्म मिळाल्याने सिरियाच्या सैन्याचा हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संग्रहित छायाचीत्र - Divya Marathi
संग्रहित छायाचीत्र

बैरुट- सिरियात मंगळवारी पहाटे क्षेपणास्त्र हल्ल्याचा अलार्म वाजल्यामुळे दहशतीची परिस्थिती निर्माण झाली होती. सिरियातील सरकारी टीव्हीच्या म्हणण्यानुसार हा चुकीचा अलार्म होता.पण बाह्य अाक्रमण किंवा क्षेपणास्त्र हल्ला झालेला नाही. चुकीच्या इशाऱ्यानंतर सैन्याने क्षेपणास्त्र पाडण्यासाठी क्षेपणास्त्र डागले, असे सरकारी टीव्हीने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने स्पष्ट केले.


सिरियाच्या हवाई सैन्याने होम्स प्रांत व दमास्कसच्या आपल्या हवाई क्षेत्रात घुसणाऱ्या क्षेपणास्त्रांना पाडले. क्षेपणास्त्र हल्ला नेमका कोणी केला हे त्यातून स्पष्ट करण्यात आलेले नाही. सिरियाच्या सरकारी टीव्हीवरून घटनेला आक्रमक असे संबोधण्यात आले आहे. या अगोदर शनिवारी पहाटे अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने रासायनिक शस्त्रांचा वापर केल्यावरून सिरियाच्या तीन ठिकाणांवर १०० हून जास्त क्षेपणास्त्र डागले होते.


दौउमामध्ये शस्त्र तज्ज्ञ दाखल
रशियाच्या म्हणण्यानुसार सिरियाच्या दौउमामध्ये रासायनिक हल्ल्यातील आरोपांचे सत्य जाणून घेण्यासाठी रासायनिक शस्त्र प्रतिबंधक संघटनेचे (आेपीसीडब्ल्यू) अधिकारी बुधवारी दौऊमामध्ये दाखल झाले आहेत. अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने दौउमामध्ये रासायनिक हल्ल्याच्या प्रत्युत्तरात सिरियात क्षेपणास्त्र हल्ला केला. रशियाने रासायनिक हल्ल्याच्या आरोपास खोटे ठरवताना अमेरिकेवर टीकाही केली होती. 

 

रशियावरील निर्बंधाचा प्रस्ताव विचार
सिरिया मुद्द्यावरून रशियावर निर्बंध लादण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या विचाराधीन आहे. व्हाईट हाऊसच्या प्रसारमाध्यम प्रमुख सारा सँडर्स म्हणाल्या, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारपासून रशियावर लावण्यात येणाऱ्या निर्बंधावर रोखले आहे. कारण या निर्बंधाच्या मसुद्यात आणखी विस्तार करणे अपेक्षित आहे. रशियावर अतिरिक्त निर्बंध लावण्याचा विचार केला जात आहे. लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...