आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सख्ख्या बहिणीच चालवायच्या सेक्स रॅकेट, अल्पवयीन मुलींना बनवले प्रॉस्टिट्युट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - ऑस्ट्रेलियात पोलिसांनी चाइल्ड प्रॉस्टीट्युशन रॅकेटचा भांडाफोड केला आहे. विशेष म्हणजे, हे रॅकेट दोन बहिणीच चालवत होत्या. त्या दोघींनी भाड्याने घर घेतले होते. याच घरात त्या कमकुवत आणि अल्पवयीन मुलींना बळजबरी वेश्याव्यवसायात ढकलायच्या. त्यापैकी काही मुली तर फक्त 12 वर्षांच्या होत्या. कोर्टाने दोन्ही बहिणींना दोषी मानत कैदेची शिक्षा सुनावली आहे. 

 

छोट्या-छोट्या गोष्टींसाठी करायच्या ब्लॅकमेल
- गरीब घरातील मुलींना या दोघी बहिणी राहण्यासाठी जागा आणि अमली पदार्थांचे अमिष देऊन आपल्या ठिकाणावर बोलवायच्या आणि त्यांना अडकवायच्या.
- अशा मुलींना आपल्या जाळात अडकवल्यानंतर त्यांना सिडनीच्या वॉरविक हॉटेल किंवा कार पार्किंगमध्ये अथवा हाउसिंग कमिशनच्या कार्यालयात कस्टरच्या भेटी करून देत होत्या. 
- तत्पूर्वी 12-13 वर्षांच्या मुलींना हेवी मेक-अप करायला भाग पाडले जात होते. जेणेकरून त्या ग्राहकांपुढे अल्पवयीन दिसणार नाहीत. 
- काही हजार रुपये किंवा आवश्यक वस्तूंचे अमिष दाखवून त्या मुलींना ब्लॅकमेल करत होत्या. त्यापैकी काहींना या बहिणींनी भाच्या-भाचींसाठी नॅपी देतो असे म्हणत तयार केले. 
- मुलींना विरोध केल्यास त्यांना भिती दाखवून धमकावले जात होते. एका 13 वर्षीय मुलीने स्थानिक माध्यमांशी संवाद साधला. तसेच बेघर होण्याच्या आणि उपाशी मरण्याच्या भितीने आपण हे काम केल्याचे म्हटले. 

 

असा झाला खुलासा
- या प्रकरणात दोन बहिणींपैकी एकीला 4 आणि दुसरीला 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच इतर 3 पुरुषांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले आहे. 
- या रॅकेटचा खुलासा फेब्रुवारी 2012 मध्ये झाला होता. त्यावेळी एका व्यक्तीने आपल्याला एका अज्ञाताने लुटल्याची तक्रार केली.
- त्या व्यक्तीच्या तक्रारीमध्ये पोलिसांना खोटारडेपणा दिसून आला. सविस्तर चौकशी केल्यानंतर तो चाइल्ड प्रॉस्टिट्युशन चालवत असल्याचा खुलासा झाला. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनास्थळाचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...