आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत गोळीबार: भारतीय युवकाचा मृत्यू; पालक म्हणाले, हत्येचे व्हिडिओ जारी करा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - कॅलिफोर्नियात पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये एका 18 वर्षीय भारतीय युवकाचा मृत्यू झाला. नॅथेनियल प्रसाद असे त्याचे नाव असून तो कॅलिफोर्नियातील हेवार्ड येथील रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, प्रसादच्या विरोधात फायर आर्म्स (बेकायदेशीर शस्त्र बाळगणे) प्रकरणी वॉरंट बजावण्यात आले होते. पोलिस प्रसादची चौकशी करण्यास गेले, तेव्हा त्याने अचानक गोळ्या झाडल्या. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर द्यावे लागले आणि तो मारला गेला. असे पोलिसांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, गोळीबार झाला त्यावेळी तो आपल्या आईसोबत कारमध्ये जात होता. त्यामुळे, या घटनेचे सर्वच व्हिडिओ पोलिसांनी जारी करावे तेव्हा चित्र स्पष्ट होईल असे प्रसादच्या कुटुंबियांनी म्हटले आहे. 

 

काय म्हणाले पोलिस...?
- पोलिस रिपोर्टनुसार, "डिपार्टमेंटच्या स्ट्रीट क्राइम युनिटने फ्रीमोंट परिसरात प्रसादला एका गाडीत जाताना पाहिले. ही कार एक महिला ड्राइव्ह करत होती. 2 पोलिस अधिकाऱ्यांनी गाडी अडवली. पण, प्रसाद कारमधून पसार होण्याच्या झटापटीत पोलिसांवर फायर केला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. यात प्रसादचा मृत्यू झाला. प्रसादच्या हातात बेकायदेशीर बंदूक होती. ज्या कारमध्ये तो जात होता, ती त्याची आई चालवत होती. प्रसादकडे पॉइंट 22 कॅलिबरचे रिव्हॉल्वर होते. ज्याच्या तीन केस रिकाम्या होत्या. हे रिव्हॉल्वर चोरीचे होते."
- पोलिसांनी सांगितल्याप्रमामे, हा संपूर्ण प्रकार पोलिसांच्या शरीरावर असलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधित पोलिस आणि स्थानिकांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात आले आहेत. सोबतच कारमध्ये लागलेल्या कॅमेऱ्याचा फुटेज देखील तपासून पाहण्यात आला. 

 

आईच्या जबाबानंतर अधिकारी सुट्टीवर
- स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रसादच्या आईने आपला जबाब पोलिसांत नमूद केला. पण, तिने काय म्हटले ते जाहीर करण्यात आलेले नाही. सोबतच, या गोळीबारात ज्या 6 पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग होता, त्या सर्वांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. 
- ईस्ट बे टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रसादचे वडील डॅनिएल प्रसाद यांनी पोलिसांना खरे काय ते समोर आणण्याचे आवाहन केले आहे. प्रसादबद्दल पोलिस जे काही बोलत आहेत ते सर्वस्वी खोटे आहे. प्रसाद अतिशय चांगला मुलगा होता. तो आपल्या हायस्कूलची डिग्री घेण्याची वाट पाहात होता. तर प्रसादच्या एका चुलत भावाने पोलिसांना सर्वच फुटेज जारी करण्याचे आव्हान दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...