आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 दिवसांनंतर गुहेतून ४ मुले सुरक्षित काढली; जगातील सर्वात दुर्गम गुहेतील बचाव अभियानात मोठे यश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- २३ जून राेजी अडकले, नऊ दिवसांनी लागला शाेध, नंतर ६ दिवसांनी बाहेर
- फुटबॉल संघाचे ८ खेळाडू आणि त्यांचा प्रशिक्षक अजूनही गुहेतच
- ६ देशांचे ९० पाणबुडे, एक हजार जवान मोहिमेत सहभागी
- २ किमी गुहेतून ४ मुलांना बाहेर काढण्यासाठी लागले १२ तास

 

माए साई- थायलंडमध्ये रविवारी शुभवार्ता अाली. १६ दिवसांपासून लुअांग गुहेत अडकलेल्या ज्युनिअर फुटबाॅल टीममधील १२ पैकी चार खेळाडूंना १२ तासांच्या बचाव अभियानानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात यश अाले. रात्र झाल्यामुळे बचावकार्य थांबवावे लागले. इतर ८ खेळाडू व काेच अजूनही गुहेतच अडकलेले अाहेत. थायलंडसह अमेरिका, चीन, जपान, ब्रिटन व अाॅस्ट्रेलिया या देशातील ९० पाणबुडे साेमवारी पुन्हा ही माेहिम सुरू करतील. रविवारी यापैकी १८ पाणबुड्यांनी चाैघांना वाचवले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले. एक हजारहून अधिक लष्करी जवान व तज्ज्ञही या माेहिमेत सहभागी अाहेत.  बचाव पथकाचे प्रमुख नाराेंगसाक असोतानाकोर्न यांनी सांगितले की, ‘ही माेहिम लवकर फत्ते झाली नाही तर खूप माेठी संधी हातची जाईल. कारण पावसाचा धाेका राेज वाढतच चालला अाहे.’ वाईल्ड बाेर्स नामक फुटबाॅल टीम २३ जून राेजी गुहा पाहण्यास गेली हाेती, मात्र पावसामुळे ११ ते १६ वर्षीय सर्व खेळाडू अात अडकले हाेते.


ब्रिटिश पाणबुडे जॉन आणि रिक यांनी सर्वात अगोदर मुले शोधून काढली
ब्रिटिश पाणबुडे जॉन वोलेंनथन आणि रिक स्टॅटन या बचाव मोहिमेचे हीरो आहेत. या दोघांनीच सर्वात अगोदर मुले गुहेत आहेत हे शोधून काढले. चिखलात एका कपारीमध्ये ही मुले बसली होती. जॉनने विचारले, तुम्ही किती जण आहात... आतून आवाज आला १३. जॉन व रिक जगातील सर्वात अस्सल पाणबुडे आहेत. २००४मध्ये दोघांनी ब्रिटनच्या बुकी होल गुहेत खाल जाऊन विक्रम नोंदवला होता. रिक निवृत्त लढाऊ वैमानिक तर जॉन आयटी सल्लागार. रिकने २००४मध्ये मॅक्सिकोमध्ये महापुरात अडकलेल्या ६ सैनिकांना वाचवले होते. हे सैनिक ९ दिवसांपासून गुहेत अडकून होते. रिकने ९ तासांत त्यांना जिवंत बाहेर काढले. २०१०मध्ये फ्रान्सच्या गुहेत अडकलेल्या एरिकचाही त्याने जीव वाचवला होता. ती मोहीम ८ दिवस चालली होती. या मोहिमेसाठी थायलंड नौदलाने दोघांशी संपर्क साधताच त्यांनी होकार दर्शवला. २७ जून रोजी घटनास्थळी मोहीम सुरू केली. 

 

एका खलाशीचा मृत्यू, पाण्याची पातळी निच्चांकी

थायलंडची अंडर-16 फुटबॉल टीम गेल्या 12 दिवसांपासून या गुहेत अडकली आहे. त्यांना वाचवण्यासाठी 10 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू आहे. गुहेत 11 फुटबॉलर्स आणि त्यांचा 25 वर्षीय कोच अशा 12 जणांचा समावेश आहे. विविध देशांच्या रेस्क्यू टीमने या गुहेत ऑक्सिजन पुरवठा कमी होऊ नये यासाठी ऑक्सिजनच्या टाक्या सोडल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, जगभरातील तज्ञ मंडळी असतानाही ही गुहा इतकी कठिण होती की कुणालाही आतमध्ये जाता आले नाही. याच मोहिमेत एका बचाव कर्मचाऱ्याचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला. बचाव कार्यात पुराचे पाणी सर्वात मोठा अडथळा होते. 10 दिवसांत पहिल्यांदाच पुराच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने आता या मुलांना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...