आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 दिवसांपासून गुहेत अडकले 12 फुटबॉलर्स जिवंत सापडले, बचावपथकाने जारी केला Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुहेबाहेर आपल्या मुलांची वाट पाहणारे नातेवाइक तो व्हिडिओ दाखवताना... - Divya Marathi
गुहेबाहेर आपल्या मुलांची वाट पाहणारे नातेवाइक तो व्हिडिओ दाखवताना...

बँकॉक - गेल्या 9 दिवसांपासून थायलंडच्या गुहेत अडकलेले 12 जुनिअर फुटबॉलर जिवंत सापडले आहेत. 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे फुटबॉलर्स फक्त पाण्याच्या मदतीने जिवंत आहेत. ही एक अंडर-16 फुटबॉल टीम असून त्यांच्यासोबत 25 वर्षीय कोच सुद्धा अडकला आहे. सगळेच फुटबॉलर सराव करत असताना अचानक पाऊस मुसळधार पाऊस सुरू झाले. त्यापासून वाचण्यासाठी त्यांनी गुहेत आश्रय घेतला. परंतु, पाऊस वाढत गेल्याने पूर आले आणि तब्बल 10 किमी लांब गुहा बंद झाली. बचाव कार्याच्या 10 व्या दिवशी ते जिवंत असल्याचे पुरावे सापडले आहेत. पथक अजुनही त्यांच्याकडे पोहोचू शकलेले नाही. तरीही 1200 जवान या मदतकार्यात लागले असून आता लवकरच त्यांना शोधून बाहेर काढले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 


गुहेतून पाणी बाहेर काढण्याचे कामही सुरू
बचाव पथकाकडून या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 दिवसांपासून त्यातून पुराचे पाणी बाहेर काढले जात आहे. 7 दिवसांपासून हे काम सुरू आहे. लहान मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी निश्चित ठिकाणी छिद्र पाडून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गुहेत ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी 200 ऑक्सिजन सिलेंडर टाकण्यात आले आहेत. ही गुहा म्यानमार आणि लाओस सीमेवर आहे. 


मुलांचा व्हिडिओ व्हायरल
बचाव कार्याला 10 वा दिवस उलटला असतानाच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बचाव कार्य करणाऱ्या टीमच्या कॅमेऱ्याने टिपला आहे. या खेळाडूंना बाहेर काढण्याच्या मोहिमेने आंतरराष्ट्रीय स्वरुप घेतले आहे. अमेरिकेच्या तज्ञांची सुद्धा यामध्ये मदत घेतली जात आहे. गुहेच्या आतील भाग पूर्णपणे चिखलमय झाला आहे. लहान मुले गुहेतील दलदलीवर असलेल्या एका पठारावर आहेत. परंतु, जास्त काळ तेथे बसणे शक्य नाही. सोबतच या गुहेत अनेक छोटे-छोटे मार्ग असून ते कयेक किमी लांब आहेत. अशात खेळाडू त्यामध्ये भटकू नयेत अशी प्रार्थना केली जात आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, या मुलांचे आणखी काही फोटो...

बातम्या आणखी आहेत...