आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुगातीने तयार केल्या 500 कार, प्रत्येकी 20 कोटींत 47 विकल्या, त्रुटींमुळे सर्व कार रिकॉल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जगात कितीही महागड्या कार असोत, त्यात काही ना काही उणिवा राहण्याची शक्यता असतेच. फ्रान्समधील १०९ वर्षे जुनी ऑटो कंपनी असलेली बुगातीही यात मागे नाही. या कंपनीची सर्वात महागडी ‘शिरॉन’ या कारमधील ड्रायव्हिंग सीटच्या वेल्डिंगमध्ये दोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सीटचा ब्रॅकेट योग्य पद्धतीने बांधण्यात आला नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे सीट आपोआप मागे-पुढे होत असल्याच्या तक्रारी आहेत.

 

एक दिवसापूर्वी २४.५२ कोटींत विकली पहिली ‘शिरॉन’
बुगाती कंपनीच्या पहिल्या शिरॉन कारचा सोदबी कंपनीने अमेरिकेत लिलाव केला होता. या सुपरस्पोर्ट््स कारसाठी एका ग्राहकाने चक्क २४.५२ कोटी रुपयांची बोली लावली. विशेष म्हणजे या कारची मूळ किंमत ६ कोटी आहे. या कारची अजून ना नोंदणी आहे, ना ती रोडवर आली. 

 

 

शिरॉनच्या एका ग्राहकाकडे सरासरी ४२ कार, जेट आणि यॉटही
बुगातीने जगभरात आपल्या ४७ ग्राहकांना आतापर्यंत शिरॉन कारची डिलिव्हरी दिली आहे. ही कार खरेदी करणाऱ्यांची श्रीमंतीही अफलातून आहे. अशी शिरॉन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकाकडे सरासरी ४२ कार आहेत. याशिवाय अशा या गर्भश्रीमंत प्रत्येक ग्राहकाकडे सरासरी १.७ जेट विमाने व १.४ टक्के यॉटही आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...