आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलिझाबेथ मॉस, किडमनला गोल्डन ग्लोब;75 व्या पुरस्काराचा अमेरिकेत रंगारंग समारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस- अभिनेत्री एलिझाबेथ मॉसला दूरचित्रवाणीवरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाच्या गोल्डन ग्लोबने गौरवण्यात आले. आपल्या अभिनयाद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवतानाच तिने अनेक पुरस्कार नावावर केले आहेत. ‘द हँडमेड्स टेल’मधील भूमिकेसाठी ३५ वर्षीय एलिझाबेथला हा पुरस्कार मिळाला. मालिकेतील अभिनयासाठी तिने लेखिका मार्गारेट अॅटवूड यांना त्याचे श्रेय दिले. अॅटवूड यांनी १९८५ मध्ये लिहिलेल्या महिलांविषयक पुस्तकावर आधारित ही मालिका आहे.  त्यांनी मांडलेल्या स्त्री स्वातंत्र्याचा जयघोष या निमित्ताने मला करावासा वाटतो. हा पुरस्कार मार्गारेट यांचाच आहे. अन्याय, असहिष्णुतेसाठी लढणाऱ्या महिलांना हा पुरस्कार मी अर्पण करते. अशा महिला हे जग स्वतंत्र आणि समानतेच्या धाग्यात गुंफण्यासाठी धडपडू लागल्या आहेत, अशा भावना मॉसने या निमित्ताने व्यक्त केल्या. दरम्यान, गेल्या वर्षी एलिझाबेथला अॅमी अवॉर्डमध्ये उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरवण्यात आले होते.  आेप्रा विन्फ्रे यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला. अशा प्रकारचा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्याच कृष्णवर्णीय ठरल्या आहेत. 


गतवर्षीच्या विजेतीस नमवले 

मॉसची मालिकेतील व्यक्तिरेखा अत्यंत सशक्त आहे. त्यामुळेच यंदाच्या पुरस्काराच्या शर्यतीत तिने गतवर्षीची विजेती क्लेअर फॉयला नमवले. फॉयची ‘द क्राऊन’मधील अभिनयाच्या जोरावर मोठी दावेदारी मानली जात होती. 

 

एकमेव आशियाई अझिझ अन्सारी  

‘मास्टर ऑफ नन’ मधील अभिनयासाठी अझिझ अन्सारी यास सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनयासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अन्सारी हा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळवणारा यंदाचा एकमेव आशियाई कलाकार ठरला आहे. अन्सारी भारतीय वंशाचा कलाकार आहे. तो मूळचा तामिळनाडूतील आहे. मात्र, त्याचा जन्म आणि शिक्षण अमेरिकेत झाले आहे.  

 

 

निकोल किडमनला पुरस्कार 

७५ व्या गोल्डन ग्लोबसाठी अभिनेत्री निकोल किडमनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवारी झालेल्या रंगारंग कार्यक्रमात ‘बिग लिटल लाइज’साठी हा पुरस्कार तिला मिळाला. हा महिला शक्तीचा विजय असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो... 

बातम्या आणखी आहेत...