आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापॅरिस- पॅरिसमधील आयफेल टॉवरची चमक गेल्याने त्याला रंगवले जाणार आहे. टॉवरच्या १२९ वर्षांच्या इतिहासात १९ व्या वेळी टॉवरचा रंग बदलला जाईल. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात कामाला सुरुवात होणार असली तरी त्यासाठी तयारी आतापासून केली जात आहे. पॅरिस शहर प्रशासन आणि फ्रान्स सरकारने टॉवरला लाल रंग देण्याची योजना बनवली आहे. १८८९ मध्ये जेव्हा आयफेल टॉवरची निर्मिती झाली तेव्हा याचा रंग लाल होता. इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुन्हा एकदा लाल रंग दिला जाईल. सध्या आयफेल टॉवरचा रंग भुरकट झाला आहे.
प्रशासनानुसार, टॉवर काही ठिकाणी गंजत आहे. त्यामुळे टॉवरचे सौंदर्य नष्ट होण्याची भीती आहे. गंज हटवण्यासाठी दरवर्षी टॉवरला रंग देणे अशक्य आहे. पण लाल रंग दिला तर गंज चढल्यासारखे वाटणार नाही. टॉवरला लाल रंग देण्याच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होणे बाकी आहे. पण आयफेल टॉवरच्या रंगकामाचे बजेट २.४ कोटी इतके निश्चित करण्यात आले. रंगकाम करण्यासाठी जवळपास तीन वर्षांचा वेळ लागेल. यात ६० हजार किलो रंग लागण्याचा अंदाज आहे.
३२४ मीटर उंच आयफेल टॉवरला १८८९ मध्ये वास्तुविशारद गुस्ताव आयफेलने बनवले होते. आतापर्यंत १८ वेळा टॉवरला रंग देण्यात आला. दर ७ ते ८ वर्षांनी पूर्ण टॉवरला रंग देण्यात येतो. एका वेळी २५ लोकांची टीम रंग देत असते. टॉवरचे लोखंड जुने झाले असून त्यावर लोहाचे थर जमले आहेत. त्यामुळे रंग देणाऱ्या मजुरांना इन्फेक्शन होण्याचा धोका बळावतो. ही बाब लक्षात घेत पॅरिसच्या शहर प्रशासनाने टॉवरचा रंग पूर्णपणे बदलण्याऐवजी जुन्या रंगावरच भुरकट रंग देण्याचा सल्ला दिला आहे. फ्रान्स मंत्रालय यावर शेवटचा निर्णय घेणार आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, १८ वेळा टॉवरच्या रंगात लहान-मोठे बदल, ५ वेळा पूर्ण रंग बदलला
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.