आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉम्बहल्ल्यातून पॅलेस्टाइनचे पंतप्रधान बचावले, हमासवर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जबालिया (गाझापट्टी)  - पॅलेस्टाइनचे पंतप्रधान रमी हमदल्लाह बॉम्बहल्ल्यातून थोडक्यात बचावले. त्यांच्या ताफ्यावर येथे बॉम्बहल्ला झाला. पंतप्रधान या भागात दौरा करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. त्यांच्या फतह पार्टीने सांगितले की, गाझातील दहशतवाद्यांनी  पंतप्रधानांना ठार करण्यासाठी कट रचला होता.

 

इरेझ क्रॉसिंग या इस्रायली सीमेजवळून ताफा जात असताना हा हल्ला करण्यात आला. सुदैवाने पंतप्रधान हमदल्लाह हे सुखरूप आहेत. येथील एका प्रलंबित सांडपाणी प्रकल्पाच्या पाहणी व उद्घाटनासाठी हमदल्लाह येथे आले होते. उत्तर गाझामध्ये या प्रकल्पाची पाहणी त्‍यांना करायची होती.

 

हमास सत्ताधाऱ्यांवर कट रचल्याचा आरोप : हमदल्लाह यांच्या फतह पक्षाने गाझा पट्टीवर असलेल्या हमास सत्ताधाऱ्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यामध्ये पंतप्रधानांच्या ताफ्यातील ३ वाहनांचे नुकसान झाले. त्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून त्यावर रक्ताचे डाग दिसून आले.


गाझाचा दौरा करणार : पंतप्रधानांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, गाझा परिसरात राजकीय दौरे थांबावेत यासाठी हा हल्ला झाला आहे. मात्र, तसे होणार नाही. पॅलेस्टाइन प्रशासन यापुढेही येथे भेटी देणार आहे. २००७ पासून या वादग्रस्त क्षेत्राविषयी समेट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हमासने येथे फतह फौजांचे वर्चस्व संपुष्टात आणले. त्यामुळे वाटाघाटींना अडथळे येत आहेत. पॅलेस्टाइन प्रशासनाला पाश्चात्त्य देशांचे समर्थन आहे. इस्रायलव्याप्त वेस्ट बँक येथे त्यांचे वर्चस्व आहे.

 

२००७ पासून प्रलंबित प्रकल्प पूर्णत्वास   
२००७ पासून येथील पॅलेस्टाइन वर्चस्वाखालील क्षेत्रातील सांडपाणी प्रकल्प रखडला होता. यासाठी जागतिक बँक, युरोपीय महासंघ व इतर युरोपीय देशांनी ७५ दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला होता. येथील सांडपाणी वहन व्यवस्था कोलमडल्याने ५ ग्रामस्थांचा बळी गेला होता. हमासने २००७ नंतर येथे जम बसवल्याने हा प्रकल्प रखडला असल्याचे सूत्रांनी सांगितले.   

 

 

बातम्या आणखी आहेत...