आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्न-पाण्याविना 12 दिवस चिमुकल्यांना जिवंत ठेवणारा Hero; वाचा कोण आहे हा Coach!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकापोल आपल्या शीष्यांसोबत... - Divya Marathi
एकापोल आपल्या शीष्यांसोबत...

स्पेशल डेस्क - गेल्या दोन आठवड्यांपासून अन्न-पाण्याविना गुहेत अडकलेले थायलंडचे अंडर-16 फुटबॉलर्स जिवंत असल्याचे श्रेय त्यांच्या कोचला जाते. केवळ देशच नव्हे, तर जगभरात 25 वर्षीय फुटबॉल कोच एकापोलला नायक आणि देव मानले जात आहे. माध्यमांशी संवाद साधताना गुहेत अडकलेल्यांच्या पालकांपैकी कुणीही एकापोलला दोष दिला नाही. उलट, तो आपल्या मुलांसोबत गुहेत असल्यानेच ते आतापर्यंत जिवंत आहेत असे ते सांगत आहेत. तो या गुहेत नसता तर पहिल्याच आठवड्यात या मुलांचा दुर्दैवी अंत झाला असता असे म्हटले जात आहे. त्यामुळे, हा कोच नेमका कोण आहे. आणि त्याने गुहेत असे कोणते चमत्कार केले की ही मुले सुखरूप आहेत. याबद्दल सर्वांना उत्सुकता आहे. 


बौद्ध भिक्षू होता, यामुळे बनला फुटबॉल कोच...
> एकापोल एका बौद्ध भिक्षू होता. गेल्या कित्येक वर्षांपासून तो एका भिख्खूचे आयुष्य जगत होता. ध्यान साधना आणि कठिण परिस्थितीत शरीराला जिवंत कसे ठेवता येईल याचे प्रशिक्षण त्याने घेतले होते. 10 वर्षांचा असताना एकापोलच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतरच त्याने भिक्षू होण्याचा निर्णय घेतला होता. 
> या जगात त्याच्या आजीशिवाय दुसरे कुणीच नाही. तीन वर्षांपूर्वी त्याच्या आजी अतिशय आजारी असल्याचे त्याला कळाले होते. उपचारासाठी लागणारा खर्च अधिक होता. त्यामुळे, त्याने पैसे कमवण्यासाठी फुटबॉल ट्रेनिंग अकादमी जॉइन केली. मू पा या अंडर-16 फुटबॉल टीमचे हेड कोच नोप्पारत खांथावोंग (37) यांनी त्याला नोकरी दिली. तेव्हापासूनच तो मू पा फुटबॉल टीमचा सहाय्यक कोच बनला. 


अन्न-पाण्याविना मुलांना असे ठेवले जिवंत
- नोप्पारत यांनी वॉशिंग्टन पोस्टला दिलेल्या माहितीनुसार, फुटबॉल टीमच्या सरावात त्यांनीच एकापोलला पाठवले होते. तोच या टीमसाठी एक दैवी शक्ती ठरला आहे. गुहेत अडकल्याच्या पहिल्या दिवसापासून 12 दिवसांपर्यंत फक्त एकापोलच्या प्रयत्नांमुळे ही मुले जिवंत आहेत. युवा फुटबॉलर्सकडे प्रॅक्टिस दरम्यान खाण्यासाठी काहीही नव्हते. परंतु, आपल्या ट्रेनींची काळजी घेत एकापोल स्वतः त्यांच्यासाठी जेवण घेऊन गेला होता.
- नोप्पारत यांनी सांगितल्याप्रमाणे, सद्यस्थितीला त्या गुहेत सर्वात कमकुवत कुणी असेल तर तो एकापोल आहे. कारण, पहिल्या दिवसापासूनच एकापोलने आपले जेवण थोडे-थोडे करून फक्त त्या मुलांना खाऊ घातले आहे. थोडेसे खाऊन आणि पाण्याचे कमीत-कमी सेवन करून कसे जगता येईल याचे धडे तो गुहेत आपल्या शीष्यांना देत आहे. सोबतच जेवल्यानंतर ऊर्जा वाया जाऊ नये यासाठी तो या मुलांकडून ध्यान करून घेत आहे. एकूणच अतिशय कमी साधनांमध्ये या मुलांना त्याने जगण्याची कला शिकवली. त्याने स्वतःची परवा न करता जीव धोक्यात टाकून या मुलांना जिवंत ठेवले आहे. 


मुलांना शिकण्यासाठी असे करायचा प्रोत्साहित
नोप्पारत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कोच म्हणून काम सुरू केले तेव्हापासूनच एकापोलने स्वतःला आपल्या शीष्यांसाठी समर्पित केले. तोच या मुलांकडून वेळेवर ट्रेनिंग करून घ्यायचा. मू पा अंडर-16 संघात बहुतांश मुले अनाथ आणि निर्वासित आहेत. म्यानमार थायलंड सीमेवर राहणाऱ्या या मुलांना आयुष्यात ध्येय एकापोलनेच दिले. त्याने या मुलांना फुटबॉल खेळण्यास प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना लागू केल्या. त्यानुसार, जो वेळेवर प्रॅक्टिस करेल आणि चांगली कामगिरी करून दाखवेल अशा शीष्याला फुटबॉल, पॅड आणि शूजसह इतर साहित्ये तो बक्षीस म्हणून द्यायचा. अतिशय हलाखीचे जीवन जगणारी ही मुले भविष्यात प्रोफेशनल अॅथलीट होतील असा त्याचा विश्वास आहे.

 

बातम्या आणखी आहेत...