आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ABUSE: ब्रिटनचे हे पंतप्रधान ठरले होते बाल लैंगिक शोषणाचे बळी, साहित्यिकाचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनचे दिवंगत माजी पंतप्रधान विन्सटन चर्चिल बालपण संदर्भात एका प्रसिद्ध लेखकाने धक्कादायक खुलासा केला आहे. विन्सटन चर्चिल शाळेत असताना लैंगिक शोषणाचा शिकार ठरले असावेत असा दावा त्याने सदोहरण केला आहे. हाऊस ऑफ कार्ड्स या पुस्तकाचे लेखक आणि चर्चिल यांचे जाणकार लॉर्ड डॉब्स यांनी विन्सटन चर्चिल यांच्या लहानपणीचा एक किस्सा देखील सांगितला आहे. हिस्ट्री फेस्टिव्हलमध्ये नुकताच त्यांनी हा दावा केला आहे. 


अशक्य संघर्षमय होते चर्चिल यांचे बालपण...
- प्रसिद्ध ब्रिटिश साहित्यिक लॉर्ड डब्स यांनी विन्सटन चर्चिल यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. चर्चिल यांनी बर्कशायर येथील सेंट जॉर्ज शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी संस्थापक आणि प्रिन्सिपलने त्यांना मारहाण केली होती. चर्चिल 8 वर्षांचे असताना त्यांना निर्वस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. या प्रसंगामुळे चर्चिल शारीरिक आणि मानसिकरित्या आतून खचले होते. 
- लेखक डब्स यांनी असे म्हटले नाही की चर्चिल यांच्यावर लैंगिक अत्याचार कुणी केला. परंतु, त्यांच्या मते चर्चिल यांच्या लहानपणीचे किस्से आणि एकूणच आयुष्यावर नजर टाकल्यास त्यांच्यावर लहानपणी रेप झाला असण्याची जास्त शक्यता आहे. 
- सोबतच लेखकाने हा दावा सुद्धा केला की जेव्हा चर्चिल यांच्या पालकांनी त्यांची शाळा बदलली तेव्हा त्यांच्या निकालात सुधारणा झाली. प्रत्यक्षात, जुन्या शाळेने त्यांच्यावर इतका अत्याचार केला की त्यांच्यात अभ्यासाची इच्छाच राहिली नव्हती. चर्चिल यांचे लहानपण अवघड होते असे म्हणता येणार नाही. प्रत्यक्षात चर्चिल यांचे बालपण अशक्य होते असे ते म्हणाले.


कोण आहेत लॉर्ड डॉब्स?
ज्येष्ठ साहित्यिक लॉर्ड डॉब्स (69) ब्रिटनच्या सर्वात लोकप्रीय लेखकांपैकी एक आहेत. त्यांचे हाऊस ऑफ कार्ड्स ही पुस्तक सिरीझ बेस्ट सेलिंग ठरली. त्यांनी विन्सटन चर्चिल यांच्या आयुष्यावर एक-दोन नव्हे, तर चक्क 4 बायोग्राफी लिहिल्या आहेत. ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांचे ते मुख्य सल्लागार होते. त्यांच्या राजकीय अभ्यासाचा फायदा त्यांनी आपले पुस्तक हाऊ ऑफ कार्ड्समध्ये घेतला. हे पुस्तक पूर्णपणे राजकारणावर आधारित आहे. 2010 पासून ते ब्रिटनमध्ये खासदार आहेत. पंतप्रधानांचा युद्धमय अभ्यास करण्यापूर्वी त्यांच्या लहानपणाचा अभ्यास करणे आवश्यक होते. महान नेता असेच घडत नाहीत. त्यासाठी त्यांनी खूप काही सहन केलेले असते. अशाच गोष्टी त्यांना आयुष्यात मजबूत करतात असे डॉब्स यांनी सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...