आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • ट्रम्प यांनी दिले 'स्पेस फोर्स' तयार करण्याचे आदेश, असे सैन्य बनवणारा अमेरिका ठरणार पहिला देश Trump Directs Pentagon To Create Space Force

ट्रम्प यांनी दिले 'स्पेस फोर्स' तयार करण्याचे आदेश, असे सैन्य बनवणारा अमेरिका ठरणार पहिला देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> सध्या अमेरिकेकडे आर्मी, एअरफोर्स, मरीन, नेव्ही आणि कोस्ट गार्ड सैन्य आहे.
> ट्रम्प यांनी स्पेस फोर्स बनवण्याचा निर्णय देशाच्या सुरक्षेसाठी जोडले.

 

वॉशिंग्टन - अमेरिका अंतराळात आपला दबदबा बनवण्यासाठी स्पेस फोर्स गठित करणार आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पेंटागॉनला स्पेस फोर्स तयार करण्याचे आदेशही दिले आहेत. ट्रम्प यांच्या मते, हा निर्णय अमेरिकेच्या सुरक्षेला प्राधान्य देत घेण्यात आला आहे. अमेरिका या प्रकारच सैन्य बनवणारा पहिला देश असेल.

डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय अंतराळ परिषदेत म्हटले की, "जेव्हा अमेरिकेच्या सुरक्षेचा विषय येतो, तेव्हा अंतराळात आपली केवळ उपस्थितीच पुरेशी नाही. अंतराळातही अमेरिकेचा दबदबा असला पाहिजे. यासाठी मी पेंटागॉनला स्पेस फोर्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या एअरफोर्सप्रमाणेच स्पेस फोर्सही असेल. परंतु ही त्यापेक्षा वेगळी असेल. पूर्ण जगाची नजर आपल्यावर आहे, अमेरिका पुन्हा सम्मानित होत आहे. स्पेस फोर्सच्या योजनेमुळे केवळ रोजगारच मिळणार नाहीत तर देशाच्या नागरिकांचा विश्वासही वाढेल.

स्पेस फोर्स अमेरिकी सैन्याची 6वी शाखा असेल. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पूर्वीही असे सैन्य तयार करण्यावर जोर देत आले आहेत. अमेरिकेकडे सध्याच्या काळात यूएस आर्मी, एअरफोर्स, मरीन, नेव्ही आणि कोस्ट गार्ड आहेत. असे मानले जात आहे की, अमेरिका या फोर्ससोबतच भविष्यात अंतराळात होणाऱ्या कोणत्याही युद्धासाठी तयार राहील. स्पेस ऑपरेशनमध्ये निगराणीसाठी या फोर्सचा वापर केला जाऊ शकतो.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos... 

बातम्या आणखी आहेत...