आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • ट्रम्प यांचा 10 दिवसांत यू टर्न: Trump Extends National Emergency Against N Korea By One Year

ट्रम्प यांचा 10 दिवसांत यू-टर्न: आधी म्हणाले होते- उत्तर कोरियापासून जोखीम नाही; आता म्हणाले- धोका तर कायम आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- अमेरिकेने सलग 11व्या वर्षी उत्तर कोरियावर नॅशनल इमर्जन्सी लावली.

- 12 जून रोजी सिंगापुरात भेटले ट्रम्प आणि किम जोंग ऊन


वॉशिंग्टन - अमेरिका-उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांच्या इतिहासात पहिली भेट आणि एकत्रित प्रेस कॉन्फ्रेंसच्या 10 दिवसांनंतरच डोनाल्ड ट्रम्प यांनी यू-टर्न घेतला. हुकूमशहा किम जोन्ग ऊनच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी 13 जून रोजी ट्रम्प म्हणाले होते की, उत्तर कोरियापासून आता धोका नाही. अमेरिका निर्धास्त राहू शकते. शुक्रवारी रात्री त्यांनी उत्तर कोरियाविरुद्ध नॅशनल इमर्जन्सी एका वर्षासाठी वाढवली. असेही म्हटले की, उत्तर कोरियापासून अजूनही असाधारण आणि असामान्य परमाणु धोका बनलेला आहे. अमेरिकेने 26 जून 2008 रोजी पहिल्यांदा उत्तर कोरियावर इमर्जन्सी लावली होती.

 

सिंगापुरात भेटले होते ट्रम्प अन् किम: 
70 वर्षांपासून शत्रू असलेले अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान 12 जून रोजी पहिल्यांदा सिंगापूरमध्ये बातचीत झाली. 71 वर्षीय ट्रम्प यांनी 34 वर्षीय किमला आण्विक शस्त्रास्त्रे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी राजी केले होते. ट्रम्प यांनी त्याबदल्यात सुरक्षेची गॅरंटी दिली होती. उत्तर कोरियाची मोठी मागणी मान्य करत ट्रम्प यांनी दक्षिण कोरियासोबतचा संयुक्त युद्धाभ्यास बंद केला होता. ट्रम्प आणि किम 90 मिनिटे सोबत राहिले. 38 मिनिटांपर्यंत दोघांची एकांतात चर्चा झाली. तत्पूर्वी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ड्वाइट आइजनहॉवर (1953) ते बराक ओबामा (2016) पर्यंत 11 अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी उत्तर कोरियाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु ट्रम्प यांच्यासारखे यश कुणालाही मिळाले नव्हते.

 

13 जून रोजी ट्रम्प यांचे दोन ट्विट :

पहिल्या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी लिहिले होते- ''मोठ्या दौऱ्यावरून आताच परतलो आहे. आता प्रत्येक जण सुरक्षितता अनुभवू शकतो. उत्तर कोरियापासून आता आण्विक धोका नाही. किम जोंग ऊनसोबतची भेट चांगली आणि सकारात्मक राहिली.'' दुसऱ्या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी लिहिले- ''राष्ट्राध्यक्षपद सांभाळण्याआधी आम्ही हे मानून चालत होतो की, उत्तर कोरियाशी युद्ध होईलच. राष्ट्राध्यक्ष ओबामाही म्हणाले होते की, उत्तर कोरिया आमच्यासाठी सर्वात मोठा धेका आहे. परंतु आता असे नाहीये. आजच्या रात्री बिनधास्त झोपा.''

 

10 दिवसांनंतर ट्रम्प यांचा यू-टर्न :

ट्रम्प यांनी शुक्रवारी उत्तर कोरियाविरुद्ध 11व्या वर्षी नॅशनल इमर्जन्सी लागू करत लिहिले- उत्तर कोरियापासून परमाणु प्रसाराचा धोका अजूनही कायम आहे. उत्तर कोरियाची धोरणे आणि खासकरून त्यांच्या मिसाइल प्रोग्राम व परमाणु कार्यक्रमापासून अजूनही अमेरिकेची सुरक्षा, विदेश नीती आणि अर्थव्यवस्थेला धोका आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, ट्रम्प यांचे दोन्ही ट्विट...  

बातम्या आणखी आहेत...