आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोनाल्ड ट्रम्प-उन यांच्यात मे महिन्यात होणार शांतता चर्चा; योंग यांनी वृत्तास दिला दुजोरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- जगावर युद्धाचे ढग येतील, अशी भीती व्यक्त होत असतानाच शुक्रवारी एक सुखद बातमी आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जाँग उन यांच्यात मे महिन्यात चर्चा होणार आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार चुंग इयू योंग यांनी गुरुवारी रात्री याबाबतच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. 


दक्षिण कोरियाचे शिष्टमंडळ व राष्ट्राध्यक्ष मून यांच्या प्रयत्नाचे आम्ही कौतुक करतो. ट्रम्प निश्चितपणे किम जाँग उन यांचे भेटीचे निमंत्रण स्वीकारतील. योग्य ठिकाणी आणि वेळी ही भेट निश्चित केली जाईल. उत्तर कोरियाला अण्वस्त्रमुक्त करण्यात यश मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. मात्र, तोपर्यंत उत्तर कोरियावरील सर्व प्रकारचे निर्बंध लागू राहतील. व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांची भेट घेऊन चुंग म्हणाले, किम जाँग उन यांनी लवकरात लवकर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. ट्रम्प यांनी उन यांची मेपर्यंत भेट होऊ शकेल, असे स्पष्ट केले आहे.  


ट्रम्प- उन यांच्यातील भेटीबाबत अनुकूलता दिसून आली आहे. मात्र, उभय नेत्यांमधील ही भेट नेमकी कधी होईल, याबद्दल मात्र चुंगी यांनी काहीही माहिती दिली नाही. चुंग यांच्या नेतृत्वाखाली याच आठवड्यात दक्षिण कोरियाचे एक प्रतिनिधी मंडळ उत्तर कोरियाला गेले होते. तेव्हा किम जाँग उन व  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अमेरिकेशी चर्चा करण्याची इच्छा दर्शवली होती. याबरोबरच किम जाँग उन अण्वस्त्रमुक्त व संबंध सामान्य करण्यासाठीदेखील चर्चेस तयार असल्याचे सांगितले होते.  

 

ट्रम्प यांच्याकडे पत्र सोपवले  
दक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा कार्यालयाचे प्रमुख चुंग इयी योंग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ट्रम्प यांना जाँग यांनी लिहिलेले पत्र दिले आहे. कोरियातील प्रदेशात स्थायी स्वरूपात अण्वस्त्रमुक्तीची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी मे महिन्यात उन यांची भेट घेतली जाईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. राजनयिक प्रक्रियेला सुरू ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. उत्तर कोरिया अण्वस्त्रमुक्तीच्या दिशेने ठोस पावले उचलत नाही तोपर्यंत दक्षिण कोरिया, अमेरिका व इतर सहकारी देश उत्तर कोरियावरील दबाव कायम ठेवतील, असे त्यांनी सांगितले.  


मेअखेरीस भेट शक्य 

उभय नेत्यांमधील ही भेट मे महिन्याच्या अखेरपर्यंत शक्य होऊ शकेल, असे सेऊलमधील राष्ट्राध्यक्ष कार्यालयाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. किम यांनी दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळासोबत अण्वस्त्रमुक्तीवर चर्चा केली. या दरम्यान उत्तर कोरियाद्वारे कोणत्याही क्षेपणास्त्राची चाचणी झालेली नाही. मात्र, या दिशेने काही करार होत नाही तोपर्यंत उत्तर कोरियावरील निर्बंध लागू राहतील.  

 

 

उत्तर कोरियातच होणार भेट

- व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या सारा सॅन्डर्स यांनी सांगितल्याप्रमाणे, ट्रम्प यांनी किम जोंग उन यांच्याकडून आलेले भेटीचे निमंत्रण स्वीकारले आहे. दोन्ही नेत्यांची ऐतिहासिक भेट उत्तर कोरियात होणार आहे. 
- उत्तर कोरियाने अण्वस्त्र आणि मिसाइल चाचण्या बंद कराव्या अशी आमची मागणी आहे. याच चाचण्यांमुळे आम्ही त्यांच्यावर निर्बंध आणि दबाव टाकले.

 

दक्षिण कोरियाने केली मध्यस्थी
- अमेरिका आणि उत्तर कोरियन नेत्यांची भेट करून देण्यासाठी दक्षिण कोरियाने मध्यस्थी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग आणि दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळात डिनर पार्टी आणि चर्चा झाली.
- त्याच बैठकीत दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी एकमेकांचे 7 दशकांपासूनचे वैर विसरून मैत्री संबंध वाढण्याची इच्छा व्यक्त केली. 
- दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, उत्तर कोरियाने यापुढे अण्वस्त्र आणि मिसाइल चाचणी घेणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच यापुढे डीन्युक्लिअरायझेशनसाठी पुढाकार घेणार असेही सांगितले आहे. 
- उत्तर कोरिया अमेरिकेला आणि दक्षिण कोरियाला वेळोवेळी अण्वस्त्र हल्ल्याच्या धमक्या देत असल्याचे वृत्त येत राहतात. पण, उत्तर कोरियन माध्यम आणि सरकारने नेहमीच हे अण्वस्त्र आपल्या संरक्षणासाठी असल्याचे स्पष्ट केले आहे. पाश्चात्य माध्यम आपली कुप्रसिद्धी करत असल्याचे आरोपही वेळोवेळी उत्तर कोरियाने लावले.

 

यापूर्वी कधी झाली चर्चा
- 2000 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर बिल क्लिंटन असताना अमेरिका आणि उत्तर कोरियामध्ये चर्चा झाली होती. 
- उत्तर कोरियाचे तत्कालीन नेते आणि किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांनी अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री मेडलिन अॅल्ब्राइट यांच्याशी चर्चा केली होती.
- 18 वर्षांनंतर चर्चेसाठी दोन शत्रू राष्ट्र तयार झाले असताना दोन्ही देशांनी खबरदारी घेऊन चर्चा करावी असे सल्ले दिले जात आहेत. दोन्ही देशांनी या चर्चेची संधी सोडू नये असेही तज्ञांचे म्हणणे आहे. 

बातम्या आणखी आहेत...