आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प म्हणाले : 50% अमेरिकन माझ्याशी सहमत; 12 तासांत त्यांचा दावा ठरला खाेटा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपती डाेनाल्ड ट्रम्प यांचे अाणखी एक टिवट चुकीच्या कारणांमुळे चर्चेत अाले अाहे. ट्रम्प यांनी रविवारी रात्री एक ट्विवट केले. त्यात त्यांनी ‘रॅसमसेन व इतर संस्थांनुसार ५० % अमेरिकन नागरिक माझ्याशी सहमत अाहेत व हे प्रमाण बराक अाेबामांपेक्षाही जास्त अाहे. मात्र, तरीही राजकीय पंडितांना माझी लाेकप्रियता कमी वाटते. अापण खाेटे बाेलत अाहाेत, हे त्यांनाही कळतेय. या सर्व फेक बातम्या अाहेत.’ असे लिहिले हाेते. मात्र, या टि्वटच्या १२ तासांनंतरच ट्रम्प यांचा हा दावा खाेटा सिद्ध झाला.


अमेरिकेतील राजकीय विश्लेषक जाेश जाॅर्डन यांनीही टि्वट करून स्पष्ट केले की, वेगवेगळ्या संस्थांनुसार अमेरिकेतील किती टक्के नागरिक देशाच्या राष्ट्रपतींच्या निर्णयाशी सहमत अाहेत. त्यात रॅसमसेननुसार ४४%, इकाॅनाॅमिस्टनुसार ४१%, रायटर्सनुसार ४०% व गॅलपनुसार ३९% नागरिक ट्रम्प यांच्याशी सहमत अाहेत. देशातील अव्वल मान्यता मानांकन संस्थांची अाकडेवारी एकत्र केल्यास केवळ ३५ % नागरिकच त्यांच्याशी सहमत हाेते. एकाही संस्थेने ट्रम्प यांचे मान्यता मानांकन ५० % असल्याचे सांगितलेले नाही.


१२ तासांतच दावा खाेटा सिद्ध झाल्यानंतर डाेनाल्ड ट्रम्प यांच्यावर चांगलेच ट्राेल केले गेले. तसेच बराक अाेबामांहून पुढे गेल्याचा त्यांचा दावादेखील माेठ्या फरकाने चुकीचा ठरला. अापल्या कार्यकाळाचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर बराक अाेबामांचे मान्यता मानांकन ४९.१ % हाेते. म्हणजेच, एवढे अमेरिकन त्यांच्या निर्णयाशी सहमत हाेते. ट्रम्प हे यापेक्षा खूप मागे अाहेत. गतवर्षी जूनमध्येही ट्रम्प यांनी अापले मान्यता मानांकन ५० % झाल्याचा दावा केला हाेता; परंतु हा दावा त्या वेळीही खाेटा ठरला हाेता. 

 

ट्रम्प बदलणार नाहीत निवडणूक व रशियाशी निगडित पथक
अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीत रशियाने दखल दिल्याच्या प्रकरणाचा तपास करणारे पथक अापले काम चांगल्या प्रकारे करत असून, त्यांच्या कामामुळे मी खुश अाहे. त्यामुळे हे पथक बदलले जाणार नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले अाहे. मी माझ्या तिन्ही वकिलांच्या कामाने समाधानी अाहे व ते बदलले जाण्याच्या चुकीच्या बातम्या प्रसारमाध्यमे प्रसारित करत अाहेत, असे ट्रम्प यांचे म्हणणे अाहे. ‘अशा प्रकारच्या बातम्या लिहिणारी मॅगी हेबरमन वास्तवात हिलरी क्लिंटन यांची मैत्रीण अाहे व तिला माझ्याबाबत काहीच माहिती नाही; परंतु तरीही ती हे सर्व लिहितेय.’ असे ट्रम्प यांनी लिहिले अाहे.

बातम्या आणखी आहेत...