आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतावर पुन्हा बरसले Trump; अमेरिकन Products वर 100% आयात शुल्क वसूल करण्याचे आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 17 दिवसांत पुन्हा भारतविरोधी उद्गार काढले आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर अमेरिकन उत्पादनांवर 100 टक्के आयात शुल्क वसूल करण्याचे आरोप लावले आहेत. यापूर्वी 11 जून रोजी जी-7 समिटमध्ये सुद्धा ट्रम्प यांनी भारतावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. ते म्हणाले, सर्वच देशांसोबत टॅरिफ (शुल्क) समाप्त करून व्यवसाय करू इच्छितो. आम्हाला सर्वच प्रकारचे शुल्क आणि कर समाप्त करून सरल व्यापार करायला हवा. ट्रम्प यांनी नुकतेच भारतासह इतर अनेक देशांतून अमेरिकेत जाणाऱ्या उत्पादनांवर आयात शुल्कात वाढ केली. त्यावर भारताने सुद्धा अमेरिकेच्या 29 प्रॉडक्ट्सवर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

पुढील आठड्यात भारत-अमेरिका चर्चा 
अमेरिकेने भारतातून येणाऱ्या पोलादवर 25% आणि अलुमीनियमवर 10% आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय 9 मार्च रोजी घेतला होता. त्यामुळेच भारतावर 24 कोटी डॉलर अर्थात 1,650 कोटी रुपयांचे वार्षिक ओझे वाढले आहे. भारतातून दरवर्षी 10 हजार कोटी रुपये स्टील आणि अलुमीनियम अमेरिकेत निर्यात केले जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे वक्तव्य दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या पुढील आठवड्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवर आले आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यात सहभागी होणार आहेत. 


सगळचे अमेरिकेला लुटताहेत -ट्रम्प
ट्रम्प यांनी 11 जून रोजी कॅनडा येथे पार पडलेल्या जी-7 संमेलनात सगळेच देश अमेरिकेला लुटत आहेत अशी टीका केली होती. भारतावर निशाना साधताना ते म्हणाले होते, की टॅरिफ संदर्भातील तक्रारी केवळ विकसित देशांकडूनच नव्हे, तर सर्वच देशांकडून आहेत. भारतात सुद्धा अमेरिकेच्या प्रॉडक्ट्सवर 100 टक्के टॅरिफ वसूल केले जात आहे. हे थांबायलाच हवे. अन्यथा अशा देशांसोबत आम्हाला व्यापार थांबवावा लागेल. हाच पर्याय आमच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार गेल्या वर्षी 8.32 लाख कोटी रुपयांचा झाला होता. त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये झालेली वाढ ही विक्रमी आहे.

 

बातम्या आणखी आहेत...