आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रम्प ब्रिटनच्या दौऱ्यावर, महाराणींना 15 मिनिटे प्रतीक्षा करावी लागली; प्रोटोकॉल तोडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १२ रोजी ब्रिटनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मात्र ट्रम्प यांनी आपल्या वागण्यातून वादंग आेढवून घेतले. शनिवारी ट्रम्प-महाराणी एलिझाबेथ यांची भेट ठरली होती. तेथे ट्रम्प यांना महाराणींच्या ब्रिटीश सेनेची सलामी देखील मिळाली होती. महाराणींच्या भेटीदरम्यान ब्रिटनच्या राजघराण्याच्या हाय-प्रोटोकॉलचे पालन करावे लागते. परंतु ट्रम्प यांनी एक-दोन नव्हे तर तीन प्रोटोकॉल तोडले.


प्रत्यक्ष भेटीपूर्वी ट्रम्प यांना येण्यास उशिर झाला. त्यामुळे महाराणींना त्यांची प्रतीक्षा करत बसावे लागले. महाराणी ट्रम्प यांच्या येण्याची पंधरा मिनिटे वाट पाहत उभ्या राहिल्या होत्या. अखेर ट्रम्प व मेलानिया आले. प्रोटोकॉलनुसार दोघांनी मान थोडी झुकवून महाराणी यांना अभिवादन करणे अपेक्षित होते. प्रसंगाला सावरत महाराणी यांनीच स्मितहास्य करत ट्रम्प यांच्या दिशेने पुढाकार घेत हस्तांदोलन केले.त्यानंतर ट्रम्प व महाराणी यांनी चालत जाऊन ब्रिटनच्या सैन्य संचलनाची पाहणी करायची होती. तेथेही ट्रम्प यांनी राष्ट्रप्रमुखाचा प्रोटोकॉल तोडला आणि ते महाराणीला मागे सोडून पुढे-पुढे चालू लागले. खूप पुढे गेल्यावर ट्रम्प थांबले. तेव्हा कुठे महाराणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकल्या. या वर्तनाबद्दल ब्रिटनच्या प्रसार माध्यमांनी ट्रम्प यांचा असभ्यपणा अशी टीका केली आहे. वास्तविक ट्रम्प यांच्या ब्रिटन भेटीपूर्वीच त्यास मोठ्या प्रमाणात विरोध केला जात होता. लंडनमध्ये तर ट्रम्प सारखे कार्टूनचे पात्र असलेला फुगाही उडवण्यात आला होता. ट्रम्प त्यांच्या विचित्र स्वभावाबद्दल आधीपासूनच आेळखले जातात.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...

बातम्या आणखी आहेत...