आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंकारा - वैमानिक, क्रू आणि प्रवाशांसह एकूण 174 जणांना घेऊन येणारे विमान धावपट्टीवरून घसरून थेट समुद्राच्या दिशेने गेले. सुदैवाने हे विमान दरीच्या कडेला अडकले आणि समुद्रात पडले नाही. हा अपघात तुर्कीच्या
ट्रॅबझोन विमानतळावर शनिवारी संध्याकाळी घडला आहे. विशेष म्हणजे, यात कुठल्याही प्रवासी किंवा क्रूला दुखापत झालेली नाही.
ब्लास्टची भिती
- एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे, अपघाताच्या वेळी प्रवाश्यांचे भितीने ओरडून हाल झाले होते. 20 मिनिटे विमान तशाच अवस्थेत अडकले होते. पण, कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही.
- त्यातच विमान घसरल्याने कॅबिनमध्ये धूर आणि इंधनाचा उग्र वास निर्माण झाला होता. त्यामुळे, आता स्फोट होतो की काय अशी धास्ती पायलट आणि समस्त क्रूने घेतली होती.
- दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितल्याप्रमाणे, खराब वातावरणामुळे प्लेन लॅन्ड करावे अशी कुणाचीही इच्छा नव्हती. तरीही विमान उतरवले आणि त्याचे नाक धावपट्टीवर आदळले तेव्हा विमानात व्हायब्रेशन सुरू झाल्या. सगळेच घाबरून ओरडायला लागले होते.
- प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने या अपघातासाठी पक्षीला जबाबदार धरले आहे. एखादा पक्षीच लॅन्डिंगच्या वेळी विमानावर आदळला त्यामुळे समतोल बिघडला अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
पुढे, या अपघाताचे आणखी काही फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.