आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीचे सिरियातील लष्कराच्या छावण्यांवर हल्ले, 36 जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बैरुट- तुर्कीच्या लढाऊ विमानांनी सिरियातील आफरीन प्रदेशातील सिरियन सरकारचे समर्थन करणाऱ्या लष्करी छावण्यांवर हल्ला केला. त्यात किमान ३६ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला शनिवारी झाल्याचे सांगण्यात आले.  


कुर्दिशच्या एका गटाने सिरियाच्या सरकारचे समर्थन करणाऱ्या लष्करी दलाने गत आठवड्यात आफरीन प्रदेशात प्रवेश केला होता. तुर्की व त्याच्या सहकारी सिरियातील बंडखोर लढवय्यांनी जानेवारीपासूनच या प्रदेशात हवाई मोहीम सुरू ठेवली होती. तुर्कीच्या हवाई हल्ल्यात काफ्र जीना छावणीला लक्ष्य करण्यात आले. तुर्की विमानांनी गेल्या ४८ तासांदरम्यान तिसऱ्यांदा आफरीनमध्ये सरकारच्या समर्थनार्थ सुरक्षा दलांना लक्ष्य केले होते. तुर्कीचे पंतप्रधान बिन अली येलडरम म्हणाले, आमच्या सैन्याने दहशतवाद्यांच्या तावडीतून राजो शहराची सुटका केली आहे. तुर्की सेनेस आफरीन शहराच्या सुमारे २५ किमी उत्तरेकडील भागावर नियंत्रण मि‌ळवण्यात यश मिळाले आहे. तुर्की वायपीजीला कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या (पीकेके) विस्ताराच्या स्वरूपात पाहिले जाते. ही संघटना तुर्कीत गेल्या तीन दशकांपर्यंत दहशतवादाच्या संघर्षात सामील राहिली आहे. अमेरिका, युरोपीय संघ व तुर्कीने त्यास दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.

 

४ लाख लोकांना जीवनावश्यक वस्तूंची गरज
संयुक्त राष्ट्र तसेच मदतीसाठी हात पुढे करणाऱ्या इतर संस्थांनी सिरियातील पीडितांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. त्याचे ४० ट्रक दमास्कसजवळ थांबवण्यात आले आहे. त्यापैकी काही ट्रक घौउता भागात पाठवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र त्यातून केवळ ७ हजार लोकांचा अन्नाचा प्रश्न सुटेल. प्रत्यक्षात ४ लाखांवर लोकांना सर्व प्रकारच्या मदतीची गरज असल्याचे संयुक्त राष्ट्राने स्पष्ट केले आहे.  

 

पूर्व घौउतामधून  हजारोंचे पलायन  
पूर्वेकडील घौउतामध्ये बंडखोरांचे वर्चस्व आहे. त्यांना हुसकावून लावण्यासाठी सरकारी फौजांनी व्यापक मोहीम हाती घेतली आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार, हल्ले होत असल्याने हजारो नागरिकांनी पूर्व भागातून पलायन करण्यास सुरुवात केली आहे.  


इराणकडून वीज  पुरवठ्याची मदत  
सिरियातील अलेप्पो शहरातील वीज व्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी इराणने मदतीचा हात पुढे केला आहे. सात वर्षांच्या संघर्षात अलेप्पोमधील वीज व्यवस्था उद्ध्वस्त झाली. आता इराण पाच वीज केंद्रे उभारण्यासाठी मदत करणार आहे. इराणचे सरकार राष्ट्राध्यक्ष बशर अल-असाद यांचे समर्थक आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...