आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफवा अन् हिंसा पसरवणाऱ्यांविरुद्ध ट्विटरने केली कारवाई, 2 महिन्यांत 7 कोटी बनावट अकाउंट बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अफवा अन् हिंसा पसरवणाऱ्यांविरुद्ध ट्विटरने केली कारवाई, 2 महिन्यांत 7 कोटी बनावट खाते बंद केले.
मे 2018 मध्ये दर आठवड्याला तब्बल 1 कोटी संशयास्पद अकाउंटची ओळख पटवली. 
टेक्नॉलॉजीत बदल करून बनावट खात्यांचा शोध लावणे झाले सोपे.

 

सॅन फ्रान्सिस्को - ट्विटरने 7 कोटी बनावट खाती बंद केली आहेत. कंपनीने मे आणि जूनमध्ये विशेष मोहीम सोडून अशा खात्यांची ओळख पटवली, ज्यांना ट्रोल आणि अफवा पसरवण्यासाठी जात होता. चीनची न्यूज एजन्सी शिन्हुआनुसार, राजकीय दबाव वाढल्यानंतर ट्विटरने ही कारवाई केली आहे.

> इतर देशांतून कंट्रोल केले जात असलेल्या बनावट खात्यांवर निगराणी ठेवू न शकल्याने अमेरिकी संसद काँग्रेसने ट्विटरची निंदा केली होती. ते म्हणाले होते की, अफवा पसरवणाऱ्या या अकाउंटमुळे अमेरिकेचे राजकारण प्रभावित होऊ शकते. ट्विटरच्या सूत्रांनुसार, खाते बंद करण्याचा दर ऑक्टोबरच्या तुलनेत दुपटीहून जास्त झाला आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये एका दिवसात 10-10 लाख खाते बंद करण्यात आले आहेत.

> भारतीयही ट्विटरवर सर्वात जास्त ट्रोलच्या बाबतीत समोर येतात. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते प्रियंका चतुर्वेदी आणि त्यांची कन्या बनावट ट्विटर अकाउंटहून धमकी देण्यात आली. विदेश मंत्री सुषमा स्वराजलाही ट्रोल करण्यात आले होते. भारतातही ट्विटरचे 3.04 कोटी युजर आहेत. 2019 पर्यंत त्यांची संख्या 3.44 कोटीवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

 

मागच्या महिन्यात ट्विटरने बदलली पॉलिसी : 
> आपल्या प्लॅटफॉर्मवर द्वेष आणि हिंसा पसरवणाऱ्या पोस्टशी निपटण्यासाठी ट्विटरने मागच्या महिन्यात पॉलिसीत बदल केले होते. यासाठी नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करणे आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची घोषणा केली होती. कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट डेल हार्वे म्हणाले, "हे सुनिश्चित केले जाईल की, ट्विटरच्या माध्यमातून लोकांना विश्वसनीय, प्रासंगिक आणि उच्च गुणवत्तेच्या सूचना मिळतील." संशयास्पद खात्यांवर ट्विटरच्या या कारवाईचा परिणाम त्यांच्या युजरच्या संख्येवर पडू शकतो. एप्रिल-जून तिमाहीचे आकडे येणे बाकी आहे, ज्यात युजर्सची संख्या घटू शकते.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...