आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • ट्विटरच्या सिस्टिममध्ये गडबड, कंपनीने 33 कोटी युजर्सना त्वरित पासवर्ड बदलायला सांगितले Twitter Warns 336 Million Users To Change Their Passwords After Bug Found In Software

ट्विटरच्या सिस्टिममध्ये गडबड, कंपनीने 33 कोटी युजर्सना सांगितले- त्वरित पासवर्ड बदला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

- कंपनी युजर्सना पासवर्ड बदलण्यासाठी पॉप-अप विंडोमध्ये मेसेज आणि सेटिंग्जची लिंकही देत आहे.

- कंपनीने म्हटले की, हे सार्वजनिक करून आम्ही लोकांवर सोडले आहे की, त्यांनी निर्णय घ्यावा.

 

सॅन फ्रान्सिस्को - ट्विटरने सुरक्षेचे कारण देत आपल्या तब्बल 33 कोटी युजर्सना त्वरित पासवर्ड बदलण्यासाठी सांगितले आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही याची माहिती दिली आहे. ट्विटरने म्हटले आहे की, नुकताच त्यांच्या सॉफ्टवेयरमध्ये एक बग आला होता, यामुळे युजर्सचे पासवर्ड असुरक्षित झाले आहेत. तथापि, कंपनीचा दावा आहे की, ही समस्या सोडवण्यात आली आहे. युजर्सचा डेटाशी कोणत्याही प्रकारची छेडछाड वा दुरुपयोग झाल्याचे समोर आलेले नाही.

 

यूजर्सना पासवर्ड बदलण्याचा सल्ला
- ट्विटरचे चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर पराग अग्रवाल यांनी शुक्रवारी ब्लॉग पोस्ट करून सांगितले की, आता सर्वकाही ठीक आहे. तथापि, त्यांनी युजर्सना पासवर्ड बदलण्याचा सल्ला दिला आहे.

 

युजर्सचे पासवर्ड कसे सुरक्षित ठेवते ट्विटर
- ट्विटर यासाठी हॅशिंग नावाची एक टेक्निक वापरते. यामाध्यमातून खऱ्या पासवर्डला एका कोडमध्ये बदलण्यात येते. परंतु, एका बगमुळे ट्विटर युजर्सचे पासवर्ड कोडमध्ये न बदलताच आपल्या ओरिजनल रूपात सेव्ह होत होते. यामुळे हॅकर्सना पासवर्ड माहिती करण्यासाठी सोपे झाले असते आणि कोट्यवधी युजर्सचा डेटा धोक्यात आला असता. तथापि, कंपनीने वेळीच ही समस्या शोधून तिचे निराकरण केले आहे.

 

पासवर्ड बदलण्यासाठी पॉप-अप विंडोमध्ये मेसेज देत आहे ट्विटर
- कंपनी आता युजर्सना पासवर्ड बदलण्यासाठी पॉप-अप विंडोमध्येच चेंज पासवर्डचे ऑप्शन देत आहे. यात बगसोबत सेटिंग पेजवर जाण्याची लिंकही देण्यात आली आहे. या पेजवर क्लिक करून युजर्स थेट आपला पासवर्ड चेंज करू शकतात.

 

युजर्सना सर्व माहिती असणे गरजेचे: ट्विटर सीईओ
- ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी म्हणाले की, हा अंतर्गत बिघाड सर्वांसमोर जाहीर करणे आम्हाला गरजेचे वाटते.
- दुसरीकडे, कंपनीचे चीफ टेक्निकल ऑफिसर पराग अग्रवाल म्हणाले, “आम्ही ही माहिती युजर्ससोबत शेअर करत आहोत, जेणेकरून लोक आपल्या अकाउंटच्या सुरक्षेबाबत निर्णय घेऊ शकतील. आम्हाला हाच योग्य मार्ग वाटतो.”  

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, खुद्द ट्विटरने या घटनेबाबत केलेले ट्विट 

बातम्या आणखी आहेत...