आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dangerous: 33व्या मजल्याच्या सज्जावर लपंडाव खेळत होती मुले, थोड्याशा चुकीने झाला असता मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लानझोऊ (चीन) - कधी-कधी लहान मुलांचा साधा-सरळ खेळही जीवघेणा ठरू शकतो. याचे उदाहरण चीनमध्ये पाहायला मिळाले. येथे इमारतीच्या 33व्या मजल्यावर खिडकीच्या बाहेर बनलेल्या सज्जावर दोन मुले लपाछपी खेळताना आढळले. थोडीशी चूक झाली असती तर त्यांचा जीवही गेला असता. इमारतीच्या समोर असलेल्या दुसऱ्या अपार्टमेंटमधील लोकांची या मुलांवर जेव्हा नजर गेली तेव्हा मोठा गोंधळ माजला. येथे राहणाऱ्या एका महिलेने ही पूर्ण घटना मोबाइलमध्ये कैद केली. त्यांनी ताबडतोब सिक्युरिटी गार्ड्सना याची माहिती दिली.

 

काय आहे व्हिडिओत?
हा व्हिडिओ गांसू प्रॉविन्सच्या लानझोऊ शहरातील आहे. येथे दोन मुले अपार्टमेंटच्या खिडकीबाहेरील सज्जावर गेले आणि लपंडाव खेळू लागले. सज्जाच्या बाजूला कोणतीही रेलिंग नव्हती. पाय थोडासाही चुकीचा पडला असता तर वाचणे कठीण होते. परंतु व्हिडिओमध्ये दिसणारी मुले या संकटापासून अनभिज्ञ निरागसपणे खेळताना दिसत आहेत.

 

सिक्युरिटी मॅनेजरला केले सतर्क
दुसऱ्या अपार्टमेंटमधून हा व्हिडिओ शूट करणारी महिला म्हणाली, हे सर्व पाहून आम्ही प्रचंड हादरलो. आम्ही त्या इमारतीच्या सुरक्षा व्यवस्थापकाला ताबडतोब याची माहिती दिली. यानंतर लागलीच त्या मुलांना सुरक्षितरीत्या घरात घेण्यात आले. बिल्डिंग मॅनेजमेंटने सांगितले की, याबाबत मुलांच्या पालकांना माहिती देण्यात आली आहे. त्यांना मुलांना एकटे न सोडण्यासाठी सांगण्यात आले आहे. परंतु, मुले अशी खेळत असताना पालक कुठे होते, हे स्पष्ट नाही.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अंगावर शहारे आणणारा हा Video व photos...  

 

बातम्या आणखी आहेत...