आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंटार्कटिकाचे हिमखंड जहाजांनी ओढून आणणार UAE, जलसंकट दूर करण्याचा उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुबई - संयुक्त अरब अमिरात (यूएई) ने आपल्या देशातील जलसंकट दूर करण्यासाठी धक्कादायक निर्णय घेतला आहे. हा देश तब्बल 12 हजार किमी दूर असलेल्या अंटार्कटिकाचे भीमकाय हिमखंड (Iceberg) जहाजांनी ओढून आणणार आहे. या प्रकल्पासाठी यूएईला 12 कोटी अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 824 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. 


हिमखंड का?
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करणे किंवा ते स्वच्छ करून वापरण्याचे तंत्रज्ञान इस्रायलसह अनेक देशांकडे आहे. परंतु, हे तंत्रज्ञान महागडे आहे. अंटार्कटिकावर असलेले बर्फ हे स्वच्छ पाण्याने बनलेले आहे. त्याखाली समुद्र असले तरीही हिमखंड स्वच्छ आहे. 12 हजार किमी दूर असले तरीही समुद्राचे पाणी स्वच्छ करून वापरण्याच्या तुलनेत ही प्रक्रिया अधिक परवडणारी आहे.


आणताना वितळल्यास काय?
या प्रकल्पाची सुरुवात 2019 पासून केली जाणार आहे. आइसबर्ग सुरुवातील थेट दुबईला आणले जाणार नाही. आधी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ किंवा आफ्रिकेच्या केपटाऊन येथे आणले जाईल. त्या ठिकाणी थांबून बर्फ वितळते आहे का, आणि तसे झाल्यास ते रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. यानंतर आईसबर्ग कोणत्या मार्गे आणि किती वेगाने यूएईला घेऊन जावे याचा निर्णय घेतला जाईल. सर्व काही सुरळीत राहिल्यास 2020 मध्ये यूएईच्या फुजैराह तटावर ते आणले जाईल. आईसबर्ग येथे आणून ठेवल्यास सुरुवातीला ते काही काळ जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. 


असे आहे तंत्रज्ञान
आइसबर्ग यूएई पर्यंत आणण्यासाठीची जबाबदारी नॅशनल अॅडव्हायजरी ब्यूरो लिमिटेडला देण्यात आली आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अल शेही यांनी सांगितल्याप्रमाणे, "आम्ही हिमखंडाच्या स्वच्छ पाण्याचे नुकसान होऊ न देता आणण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात सॅटेलाइटच्या माध्यमातून हिमखंडांची ओळख पटवून घेतली जाईल. उपग्रहानेच पाहून कोणते आइसबर्ग आणले जाईल याचा निर्णय घेतला जाईल. यानंतर आइसबर्ग ओढून आणण्यासाठी किती जहाज लागतील याची चाचपणी केली जाईल. यात समुद्रांच्या लाटांचा देखील फायदा घेतला जाईल. दोन मोठे जहाज 10 कोटी टन वजनी आइसबर्ग ओढून आणू शकतील."


किमान 9 महिने लागणार...
कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितल्याप्रमाणे, आइसबर्गला अंटार्कटिका पर्यंत आणण्यासाठी ते हिमखंड अर्थातच बर्फाचे डोंगर किती मोठे आहे यावर अवलंबून असेल. संपूर्ण प्रवासात किमान 9 महिने लागू शकतील. एकदाचा हा हिमखंड देशाच्या तटावर आला, की त्याचे तुकडे करून मोठ-मोठ्या टँकरमध्ये वितळवले जाईल आणि त्यातून निघणारे स्वच्छ पाणी वापरले जाईल. 


कायद्याच्या अडचणी?
यूएईच्या नॅशनल अॅडव्हायजरी ब्युरो लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सागरी निती निर्देशानुसार, पाण्याचा वापर कुठलाही देश करू शकतो. हिमखंड एक बर्फाचे डोंगर असल्याने ते कुठेही नेले जाऊ शकते. सोबतच एखाद्या देशाने यावर आक्षेप घेतला तरीही त्यास खोडून काढता येईल. अंटार्कटिकाचे हिमखंड एका ठिकाणावरून दुसरीकडे घेऊन गेल्याने पर्यावरणाला नुकसान होणार नाही असा दावा या कंपनीने केला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...