आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • OMG: सेक्स पॉवर वाढवण्यासाठी येथील पुरुष पितात कोब्राचे रक्त Unknown Facts Of Indonesian Food Culture Sneak Blood Used To Increase Sexual Power

OMG: सेक्स पॉवर वाढवण्यासाठी येथील पुरुष पितात कोब्राचे रक्त, गल्लोगल्ली भरते असा बाजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - 'साssप' असे नाव उच्चारताच भल्याभल्यांना घाम फुटतो. परंतु काही असेही लोक आहेत ज्यांना सापाची भीती तर दूरच उलट ते सापालाच आपले भोजन बनवतात. इंडोनेशिया अशाच काही देशांपैकी आहे जेथे विषारी सापांची डिश चवीने खाल्ली जाते. येथील महिला सुंदर दिसण्यासाठी, तर पुरुष सेक्स पॉवर वाढवण्यासाठी सापाचे रक्त वाइनसारखे प्राशन करतात. 

 

लैंगिक शक्तिवर्धक म्हणून प्राशन करतात सापाचे रक्त
इंडोनेशियामध्ये सापांच्या वेगवेगळ्या डिशेस आवडीने खाल्ल्या जातात. अत्यंत विषारी असणाऱ्या कोब्राचे रक्त चव देऊन प्यायले जाते. कोब्राचे रक्त काही जण सेक्स पॉवर वाढवण्यासाठी पितात, तर काही स्वत:ला सुंदर बनवण्यासाठी पितात. इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये लोक कोब्राचे रक्त सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्राशन करतात. येथील महिला तर आपली त्वचा सुंदर करण्यासाठी दररोज वाइनचा घोट घेतल्याप्रमाणे सापाचे रक्त पितात. एवढेच नाही, सापाच्या मासांचेही हे लोक कबाब बनवून खातात. कोबराचे रक्त प्यायल्यानंतर येथील दुकानदार 3–4 तास चहा किंवा कॉफी न पिण्याचा सल्ला देतात.  सापाच्या रक्ताने व मांसाने त्वचा तजेलदार व तब्येत चुस्त राहते असे येथील रहिवाशांचे मानणे आहे.

 

सैन्यालाही दिली जाते कोब्राचे रक्त पिण्याची ट्रेनिंग
इंडोनेशियाची राजधानी जकार्ताच्या बहुतांश भागांमध्ये कोब्राचे रक्त रस्त्यावर ठेले लावून विकले जाते. संध्याकाळ होताच या बाजारात गर्दी होऊ लागते. हिंडत-फिरत लोक याचा आस्वाद घेताना आढळतात. येथील लोक सापाचे मांसही चवीने खातात. कोब्राच्या रक्ताला प्रचंड डिमांड असल्याने येथील दुकानदार दररोज हजारो सर्पांचा बळी देतात. ही दुकाने संध्याकाळी 5च्या सुमारास उघडतात अन् रात्री 1 वाजता बंद होतात. तथापि, इंडोनेशियाची सेना त्यांच्या जवानांनी अशी ट्रेनिंगही देते की, युद्धादरम्यान विपरीत परिस्थितीत त्यांना सापाचे रक्त पिऊनही जिवंत राहता येईल. याच प्रकारचे ट्रेनिंग जवळपास सर्वच देशांच्या जवानांना दिली जाते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, इंडोनेशियातील सापांच्या बाजाराचे काही Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...