आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीत फायरिंग, दोन ठार; मारेकऱ्याचा शोध सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - मिशिगन स्टेटच्या माऊंट प्लिसेंटमध्ये असलेल्या सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीत झालेल्या फायरींगमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या मते संशयित इमारतीतच लपलेला असण्याची शक्यता असून त्याचा शोध सुरू आहे. इमारतीत असलेल्या विद्यार्थ्यांना आतमध्ये सुरक्षित स्थळी लपण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 


मारले गेलेले विद्यार्थी नाहीत 
- पोलिसांच्या मते, इमारतीच्या चौथ्या मजल्यावर फायरींग सुरू झाले. मारले गेलेले दोघेही विद्यार्थी नाहीत. 
- पोलिसांच्या मते हे हे काहीतरी खासगी प्रकरण असण्याची शक्यता आहे. 


19 वर्षांचा आहे संशयित आरोपी 
- संशयित आरोपीचे वय 19 वर्षे आणि उंची 5 फूट 9 इंच असल्याचे सांगितले जात आहे. त्याने पिवळी जीन्स आणि निळी हुडी परिधान केलेली आहे. 
- मीडिया रिपोर्ट्समध्ये त्याचे नाव जेम्स एरिक डेव्हीस ज्युनियर असल्याचे समोर आले आहे. 
- माऊंट प्लिसेंटमध्ये सेंट्रल मिशिगन युनिव्हर्सिटीचे 23000 विद्यार्थी आहेत. 


गेल्या महिन्यात फ्लोरिडाच्या शाळेत मारले गेले होते 17 जण 
- साऊथ फ्लोरिडाच्या एका हायस्कूलमध्ये 15 फेब्रुवारीला झालेल्या फायरिंगमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला होता. त्यात अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश होता. 
- आरोपी शाळेतीलच माजी विद्यार्थी निकोलस क्रूज होता. त्याचे वय 19 वर्षे आहे. पोलिसांनी त्याला अटक केली होती. 


यावर्षी अमेरिकेच्या शाळांमध्ये घडल्या फायरिंगच्या 18 घटना 
- एका गन कंट्रोल ग्रुपच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या शाळांमध्ये यावर्षी फायरिंगच्या 18 घटना घडल्या. त्यात आत्महत्येची आणि काहीही हानी झालेली नसल्याची प्रकरणेही समाविष्ट आहेत. 
- त्याशिवाय जानेवारीमध्येच बेनटॉनच्या एका शाळेत 15 वर्षांच्या मुलाने फायरिंग केले होते. त्यात दोघांनी प्राण गमावले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...