आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाचा सिद्धार्थ धर आता आंतरराष्ट्रीय दहशतवादी, मोसूलमध्ये बनला IS चा कमांडर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन / नवी दिल्ली - अमेरिकेने भारतीय वंशाचा नागरिक सिद्धार्थ धर याला ग्लोबल टेररिस्ट घोषित केले आहे. जागतिक दहशतवाद्यांच्या नव्या यादीत समाविष्ट झालेल्यांमध्ये बेल्जियन वंशाचा मोरक्कन नागरिक अब्दुल लतीफ याला देखील सामिल केले. सिद्धार्थ धर एक ब्रिटिश नागरिक आहे. आयसिसमध्ये सहभागी होण्यासाठी धर्मपरिवर्तन करून तो अबु रुमायशाह झाला. ब्रिटनमध्ये जामीन मिळाल्यानंतर तो आपल्या पत्नी आयशा आणि मुलांसह फरार होऊन सीरियात गेला. तसेच मोसूलमध्ये आयसिसचा कमांडर बनला. 

 

कोण आहे सिद्धार्थ धर..?
- ब्रिटिश माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो म्हणाला होता, की ''90 वर्षांपासून जगात खलिफा शासन नव्हते. कुराणचे कोणतेही नियम लागू केले जात नाहीत. माझी तीव्र इच्छा आहे, की ब्रिटनमध्ये शरिया कायदा लागू करण्यात यावा. एक मुसलमान म्हणून ब्रिटनचे कायदा मला आवडत नाहीत. मी आधी एक मुस्लिम आहे, नंतरही आणि शेवटी सुद्धा मुस्लिमच आहे.''
- सिद्धार्थ धर आयसिसचा सीनियर कमांडर आहे. त्याला नवा जिहादी जॉन सुद्धा म्हटले जाते. जानेवारी 2016 पासून आयसिसने शिरच्छेदांचे जेवढे व्हिडिओ जारी केले. त्या सर्वांमध्ये शिरच्छेद करणारा सिद्धार्थ धर होता. 
- यापूर्वी अरब वंशाचा ब्रिटिश नागरिक मोहम्मद एमवाझी शिरच्छेदांचे व्हिडिओ जारी करण्यासाठी कुप्रसिद्ध होता. त्याचे मूळ नाव जॉन असल्याने ब्रिटिश माध्यमांनी त्याला 'जिहादी जॉन' असे नाव दिले होते.
- नोव्हेंबर 2015 मध्ये अमेरिकेने सीरियात केलेल्या एका हल्ल्यात जिहादी जॉन ठार मारला गेला. त्याच्या जागी व्हिडिओमध्ये मास्क घालून धर येण्यास सुरुवात झाली. 

बातम्या आणखी आहेत...