आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालिबानी म्होरक्याच्या खात्म्यासाठी अमेरिकेचा ड्रोन हल्ला, 21 जण ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात-अफगाण सीमेवर दहशतवादी कारवाया सुरूच - Divya Marathi
पाकिस्तानात-अफगाण सीमेवर दहशतवादी कारवाया सुरूच

पेशावर- अमेरिकेने गुरुवारी अफगाणिस्तानातील पूर्व सीमा प्रांतात पाकिस्तानी-तालिबान संघटनेच्या प्रशिक्षण अड्ड्यांवर ड्रोन अर्थात मानवरहित विमानाद्वारे हल्ला केला. त्यात किमान २१ दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. पाकिस्तान-तालिबानी संघटनेचा म्होरक्या मुल्ला फजलुल्ला याच्या खात्म्यासाठी अमेरिकेने धडक कारवाई केल्याचे सांगण्यात येते. अलीकडे तो येथील अड्ड्यावर अनेकदा दडून बसला होता. कारवाईत त्याचा खात्मा झाला नाही.  


सुल्तान शहा गावात हा हल्ला झाला. त्यात आत्मघाती हल्ल्याचे प्रशिक्षण दिले जात होते. हल्ल्यात प्रशिक्षकाचाही खात्मा झाला, अशी माहिती पाकिस्तानच्या गुप्तहेर विभागाच्या अधिकाऱ्यांंनी दिली. पाकिस्तान-तालिबान किंवा तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान संघटना पाकिस्तान सरकारच्या विरोधात सातत्याने हिंसाचार करत आहे. अमेरिकेच्या हवाई दलाने ही कारवाई केली. अमेरिकेच्या परदेशी दहशतवाद्यांच्या यादीत तेहरिक-ए-तालिबानचाही समावेश आहे.  गेल्या महिन्यात पाकिस्तानच्या सीमेवर संशयित अमेरिकन ड्रोन हल्ला झाला होता. त्यात टीटीपीचा दुसऱ्या क्रमांकाचा म्होरक्याचा खात्मा झाला होता. तालिबान-पाकिस्तानी संघटनेने सातत्याने हिंसाचार सुरू ठेवला आहे.  गुल मोहंमद असे म्होरक्याचे नाव होते. त्याचा खात्मा करण्यात यश मिळाले. परंतु पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील दहशतवादी अड्ड्यात दडून बसलेला फझलुल्ला खोरासनीचा मात्र खात्मा झालेला नाही, असा दावा तालिबानी संघटनेेने केला आहे.  

 

कट उधळला  
अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतात अमेरिकेने हवाई हल्ला केला. हे दहशतवाद्यांंचे प्रशिक्षण केंद्र होते. पाकिस्तानात आत्मघाती हल्ला करण्याचा काही दहशतवाद्यांचा कट होता. अमेरिकेच्या हवाई हल्ल्याने या दहशतवाद्यांचा खात्मा झाला, असे पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  

 

कमांडरचा खात्मा  
अफगाणिस्तानच्या विशेष दलाने नानगरहार प्रांतात गुरूवारी केलेल्या दहशतवातविरोधी कारवाईत तालिबानच्या स्थानिक कमांडरसह ५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश मिळाले. त्यानंतर परिसरातील छापेसत्रात १२ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आल्याचे अफगाणच्या सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.   

 

 

पाक-अमेरिकेत तणाव  कायम
पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. कारण अमेरिकेने पाकिस्तानला दिली जाणारे २ अब्ज डॉलरची मदत रोखली आहे. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात ठोस पावले उचलत नाही. तोपर्यंत ही मदत दिली जाणार नसल्याचा निर्णय अमेरिकेने घेतल्याने उभय देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला आहे.  

 

हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानातून  पाठिंबा : नाटो कमांडर  

हक्कानी नेटवर्कला पाकिस्तानातून पाठिंबा असल्याचे नाटोच्या कमांडरने म्हटले आहे. अजूनही अफगाणिस्तान सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया सुरू आहेत. त्याला पाकिस्तानातून पाठिंबा असल्यामुळेच हिंसाचार सुरू आहे, असे नाटोचे कमांडर पेट्र पॅवेल यांनी म्हटले आहे. त्यामुळेच हक्कानी नेटवर्कला हा प्रदेश नंदनवनासारखा वाटतो, असे पॅवेल यांनी सांगितले.  

बातम्या आणखी आहेत...