आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचा ड्रोन हल्ला, 34 कोटींचे बक्षिस असलेला तालिबानचा म्होरक्या फजलुल्लाह ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मारला गेल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. (फाइल) - Divya Marathi
अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्या मारला गेल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. (फाइल)

काबूल - अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा (टीटीपी) म्होरक्या मौलाना फजलुल्लाह मारला गेला आहे. वास्तविक पेंटागॉनने या हल्ल्यावर कोणतीही टिप्पणी  केलेली नाही. अमेरिकेने याच वर्षी मार्चमध्ये फजलुल्लाहवर 50 लाख डॉलरचा (34 कोटी रुपये) इनाम जाहीर करण्यात आला होता. पेशावर येथील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा हा मास्टरमाइंड होता. 

 

फजलुल्लाह मारला गेल्याचा वेगवेगळे दावे 

- अमेरिकीन सैन्याने गुरुवारी म्हटले होते, की अफगाणिस्तानमध्ये एक दहशतवाद्याला लक्ष करत हल्ला केला होता. मात्र दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. 
- पाकिस्तानमधून प्रकाशित वृत्तपत्र एक्सप्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की अफगाणिस्तानमधील दंगाम जिल्ह्यातील नूर गुल काले गावात झालेल्या ड्रोन हल्ल्यात फजलुल्लाह आणि तालिबानचे 4 कमांडर मारले गेले. 
- यात असेही म्हटले आहे, की फजलुल्लाह आमि त्याचे इतर साथीदार एका कंपाऊंडमध्ये रोजा इफ्तार करत असताना ड्रोन हल्ला झाला. मात्र टीटीपीने अद्याप हल्ल्याला दुजोरा दिलेला नाही. 
- लेफ्टनंट कर्नल मार्टिन ओ'डोनेल यांनी व्हाइस ऑफ अमेरिकेला सांगितले, की अमेरिकन सैन्याने 13 जून रोजी अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवरील कुनार भागात दहशतवाद्यांविरोधात अभियान चालवले आहे. 

 

130 मुलांच्या हल्ल्याचा मास्टर माइंड 
- पाकिस्तानमधील पेशावर येथील आर्मी स्कूलवर 2014 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 151 निष्पापांचा दहशतवाद्यांनी बळी घेतला होता. यात 130 लहान मुलं होती. या हल्ल्याच मास्टरमाइंड फजलुल्लाह असल्याचे म्हटले जात होते. 

- अमेरिकच्या माहितीनुसार, 2012 मध्ये फजलुल्लाहलाने एक महत्त्वाचा आदेश दिला होता. नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजईवर हल्ला करण्याचे आदेश त्याने दिले होते. 
- मौलाना फजलुल्लाह 2013 मध्ये तहरीक-ए-तालिबान चा प्रमुख म्हणून नियुक्त झाला होता. त्याने 2010 मध्ये न्यूयॉर्कच्या टाइम्स स्केअरवर हल्ल्याचा प्लॅन केला होता. 

बातम्या आणखी आहेत...