आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीरियावर शक्तिशाली कारवाई करणार US; ट्रम्प म्हणाले, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष 'जनावर'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सीरियावर झालेल्या कथित रासायनिक हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा धमकी दिली आहे. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद, इराण, आणि रशियासह सर्वच शत्रू राष्ट्रांना यासाठी जबाबदार धरले. यात प्रामुख्याने सीरिया सरकारवर आरोप करताना त्यांच्यावर शक्तिशाली कारवाई केली जाईल. कारवाई कुठल्याही प्रकारची असेल यासाठी सर्वच पर्याय खुले आहेत असेही ते पुढे म्हणाले. 

 

सीरियन राष्ट्राध्यक्षाला म्हणाले जनावर
- सीरियाच्या बंडखोर नियंत्रित भागात शनिवारी व्हाइट हेलमेट संस्थेने रासायनिक हल्ल्याचा दावा करताना घटनास्थळाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्याच पार्श्वभूमीवर सीरियाला दुसऱ्यांदा धमकावताना ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेतली. 
- ट्रम्प यांना पत्रकारांनी कथित रासायनिक हल्ल्यांचे आरोप लावताना अधिकृत पुराव्यांची विचारणा केली. तेव्हा हे हल्ले असदनेच केले असा दावा ट्रम्प यांनी केला. एवढेच नव्हे, तर ते सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना जनावर म्हणाले आहेत. 
- केवळ सीरियाच नव्हे, तर सीरियाला मदत करणारे रशिया आणि इराणला सुद्धा यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. 

बातम्या आणखी आहेत...