आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाने बनवले सर्वात पॉवरफुल मिसाइल, अमेरिका सुद्धा यापुढे कुचकामी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मॉस्को - गेल्या काही वर्षात युरोप आणि रशियाच्या कडेला असलेल्या बाल्टिक अर्थात काळ्या समुद्राच्या किनारी वसलेल्या देशांना अमेरिकेने आपल्या पक्षात घेतले. रशिया कसा तुमच्यासाठी घातक आहे असा प्रचार करून त्या देशांच्या किनाऱ्यांवर आपली सर्वात आधुनिक क्षेपणास्त्ररोधी यंत्रणा थाड (Terminal High Altitude Area Defence) तैनात केली. नाटोच्या मदतीने तैनात करण्यात आलेल्या या यंत्रणेला रशियाने वेळोवेळी चिथावणीखोर म्हटले, तसेच त्याचे उत्तर नव्या डिफेन्स सिस्टिमने देणार असा संकल्प घेतला होता. तोच संकल्प पूर्ण करत रशियाने नवीन मिसाइल यंत्रणा आता रशियाने विकसित करून जगासमोर आणली आहे. 

 

काय आहेत या मिसाइलची वैशिष्ट्ये...
- रशियाने दोन शस्त्र लॉन्च केले आहेत. त्यापैकी एक सबमरीनमधून लॉन्च होणाऱ्या ड्रोनला क्रेकन आणि जगात कुठेही हल्ला करू शकणाऱ्या मिसाइलला बलालाइका असे नाव देण्यात आले आहे.
- बलालाइका हे अण्वस्त्रवाहक मिसाइल यंत्रणा असून ते सागरातून मारा करते. तसेच जगातील कुठल्याही कोपऱ्यापर्यंत अचूक निशाना साधू शकते. 
- याच्या रेंजवर चर्चा करताना रशियाने सांगितले, की जगातील कुठल्याही कोपऱ्यातून हल्ला केल्यास हे क्रूझ मिसाइल अख्ख्या पृथ्वी गोलाचा चक्कर लावू शकते. 
- ही एक मिसाइलरोधी यंत्रणा आहे. तसेच या यंत्रणेतून न्युक्लिअर क्रूझ मिसाइल देखील लॉन्च केली जाऊ शकते. शत्रूंच्या मिसाइलरोधी यंत्रणा उद्ध्वस्त करणे हे याचे खास वैशिष्ट्य आहे.
- विशेष म्हणजे, यातून सोडल्या जाणारे मिसाइल रडारमध्ये सापडत नाही. जोपर्यंत कळेत तोपर्यंत या मिसाइलचा हल्ला झालेला असेल. अमेरिकेच्या थाड मिसाइलरोधी यंत्रणेच्या चिंधळ्या उडवण्यासाठी हे मिसाइल पुरेसे आहे. 
- या मिसाइलची माहिती देताना यामुळे अमेरिका आणि रशियाचे संबंध आणखी उबदार होतील अशी गंमत पुतिन यांनी पत्रकार परिषदेत केली. 
- टीकाकारांनी या शस्त्राचे लॉन्चिंग आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणूक डोळ्यासमोर ठेवून करण्यात आले. जेणेकरून पुतिन यांना फायदा होईल असे आरोप लावले आहेत. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, बाल्टिक देश कोणते आणि या संघर्ष, वादाचे मूळ कारण...

बातम्या आणखी आहेत...