आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत मुलापासून वेगळे केल्याने Statue Of Liberty वर चढली आई, उतरण्यासाठी लागले 3 तास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शरणार्थींना त्यांच्या चिमुरड्यांपासून वेगळे करण्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा ही नावापुरती निघाली. अजुनही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. अजुनही शरणार्थींना त्यांच्या चिमुरड्यांची भेट करून दिली नाही असा आरोप केला जात आहे. अशाच प्रकारचे आरोप लावत एक आई चक्क स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर चढली. जोपर्यंत शरणार्थी शिबीरांमध्ये डांबून ठेवलेल्या सर्वच लहान मुला-मुलींना सोडले जात नाही, तोपर्यंत आपण उतरणार नाही अशी मागणी तिने लावून धरली. 


परिसरात मीडिया, स्थानिकांसह पोलिसांनी सुद्धा गर्दी केली. परंतु, ती कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हती. यानंतर पोलिस अधिकारी स्वतः रोपच्या साह्याने वर चढले आणि तिला बळजबरी खाली उतरवले. हा खटाटोप तीन तास सुरू होता. नंतर पोलिसांनी तिला अटक केली. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी 305.6 फूट उंच आहे. आणि ही महिला 200 फुटांपर्यंत चढली होती. 


या महिलेचे नाव थेरेसा पॅट्रिका ओकोमो आहे. थेरेसा राइझ अॅन्ड रेसिस्ट ग्रुपची सदस्य आहे. ही संघटना ट्रम्प प्रशासनाच्या शरणार्थी विरोधी इमिग्रेशन पॉलिसीचा विरोध करत आहे. या संघटनेकडून बुधवारी एक सभा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचवेळी एक आई असलेली थेरेसा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर चढली. ग्रुपचे सदस्य मार्टिन जोसेफ यांनी सांगितल्याप्रमाणे, स्टॅच्युवर चढणे आमच्या आंदोलनाचा भाग नव्हता. तसेच थेरेसा काय करत होती याची माहिती देखील ग्रुपला नव्हती. 


16 अधिकाऱ्यांनी 3 तास घालवले...
न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला सुखरूप खाली उतरवण्यासाठी 16 पोलिस अधिकारी 3 तास मेहनत घेत होते. सुरुतीला तिने आम्हाला प्रतिसाद दिला. परंतु, नंतर तिने अधिकाऱ्यांना सुनावण्यास सुरुवात केली. ती वारंवार उडी मारण्याची धमकी देत होती. अखेर 3 तासांच्या चर्चा आणि प्रयत्नानंतर ती खाली उतरण्यास तयार झाली. ही महिला स्टॅच्यू ऑफ लिबर्टीवर चढल्याने परिसरात आलेल्या 3000 पर्यटकांना परत जाण्याचे निर्देश देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...