आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Shocking: धावत्या कारमध्ये मेकअप करत होती तरुणी, डोळ्यात घुसली आयब्रोची पेन्सिल Woman Gets Eyeliner Pencil Stuck In Her Eye While Doing Makeup In A Car

Shocking: धावत्या कारमध्ये मेकअप करत होती तरुणी, डोळ्यात घुसली आयब्रोची पेन्सिल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - थायलंडमध्ये एका तरुणीला धावत्या कारमध्ये फेशियल मेकअप करणे महागात पडले. मेकअप करताना तिच्या डोळ्यात आयब्रो पेन्सिल घुसली. सोशल मीडियावर या घटनेचे फोटोज व्हायरल होत आहेत, ज्यात अलर्ट करण्यात येत आहे की, चालत्या कारमध्ये मेकअप करणे अनेकदा जीवघेणे सिद्ध होऊ शकते. 

 

कॅबच्या अॅक्सिडेंटसोबतच झाली घटना...
- बँकॉकमध्ये 20 वर्षीय तरुणी आपल्या मित्राच्या घरी जाण्यासाठी एका कॅबमध्ये बसली होती. परंतु वाटेत मोठी ट्रॅफिक असल्याने कॅब हळूहळू चालत होती.
- ट्रॅफिक जाममध्ये टाइमपास करण्यासाठी तरुणीने फेशियल मेकअप करायला सुरुवात केली. यादरम्यान, कॅब एका पिकअप ट्रकला धडकली. ज्यामुळे तरुणीला जोरदार झटका बसला. ती बूक सीटवरून फ्रंट सीटकडे येऊन आदळली.
- झटका बसताच तरुणीच्या हातात ठेवलेली आयब्रोची पेन्सिल तिच्या डाव्या डोळ्यात घुसली. तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- डॉक्टर्स म्हणाले की, सुदैवाने पेन्सिल डोळ्याच्या संवेदनशील भागात शिरली नाही, अन्यथा तिचा डोळा कायमचा निकामी झाला असता. त्यांनी सांगितले की, पेन्सिलचा अर्धा भाग डोळ्यात घुसला होता. डोळ्यातून रक्त नाही निघाले, परंतु नाकातून थोडेफार रक्त वाहिले. सध्या तरुणीची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
- तरुणीच्या डोळ्यात घुसलेल्या पेन्सिलचा फोटो दाखवून चालत्या वाहनात मेकअप करणाऱ्या महिला महिला आणि मुलींना अलर्ट केले जात आहे. 

बातम्या आणखी आहेत...