आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षे Rape, तिने वडिलांना मारून घराच्या गार्डनमध्ये पुरले, 12 वर्षांनी सांगितली कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या मँचेस्टरमध्ये एका महिलेने धक्कादायक घटनेचा खुलासा केला. येथे राहणाऱ्या बारबरा कूम्ब्सने सांगितले की, तिने 12 वर्षांपूर्वी वडिलांची हत्या करून घराच्या गार्डनमध्येच पुरले होते. तिचे वडील कॅनिथ कूम्ब्स यांना तिने मारण्याचे कारण म्हणजे, त्याने स्वतःच्याच मुलीला घरात सेक्स स्लेव्ह बनवून ठेवले होते. तिच्यावर 40 वर्षे बलात्कार केला. एवढेच नाही तर तिने वडिलांच्या बाळाला जन्मही दिला होता. 


स्वतःच कोर्टात गेली महिला 
- एक स्थानिक संस्था वार्षिक मेंटनन्ससाठी बारबराच्या घरी आली होती. महिला म्हणाली की, एक दिवस तरी हे सर्वांसमोर येणारच होते. त्यामुळे तिने स्वतःच गुन्हा मान्य केला. महिलेने सांगितले की, पतीबरोबर घटस्फोटानंतर ती वडिलांबरोबर राहत होती. पण एअरफोर्समधून निवृत्त झालेले तिचे वडील तिचे लैंगिक शोषण करत होते. एक दिवस घरातील काम करताना तिला वडिलांच्या बॅगेत एका मुलीचे नग्न फोटो दिसले. त्यामुळे रागात येत तिने दांड्याने डोक्यावर मारले. त्यावेळी खूप रक्त वाहिल्यामुळे त्यांचा त्याठिकाणीच मृत्यू झाला. 


कोर्टात काय सांगितले...  
कोर्टात कूम्ब्सहिचे वकील मार्टिन हेस्लोप म्हणाले की, आतापर्यंतची ही सर्वात दुर्दैवी घटना आहे. ते म्हणाले की, बारबराने 40 वर्षे अत्यंत मोठ्या प्रमाणावर मानसिक आणि लैंगिक शोषणाचा सामना केला. तिच्यावर शेकडो वेळा बलात्कार करण्यात आला. त्यामुळे त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले. वकिलांनी कोर्टात सांगितले की, बारबराने तिच्या वडिलांच्या बाळाला जन्मही दिला होता, पण त्याचा जन्मतःच मृत्यू झाला. 


सर्वांपासून लपवले 
बारबरावर वडिलांच्या हत्येनंतर 12 वर्षे ही बाब लपवल्याचा आरोप आहे. तसेच त्यांच्या नावावर येणारे  £189,000 (सुमारे 17 लाख) पेन्शनही तिने वापरले. वडिलांना येणार्या सर्व पत्रांनाही ती उत्तर देत राहिली. तिच्या भावाने विचारले तेव्हा तिने सांगितले की, वडिलांचा मृत्यू हार्ट अटॅकन झाला होता. या गुन्ह्यासाठी कोर्टाने बारबराला 9 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 

बातम्या आणखी आहेत...