आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर आठवड्याला महिला पुरुषांपेक्षा 8 तास अधिक काम करतात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जास्त काम करूनही महिलांना प्रत्येक तासाला पुरुषांपेक्षा २६८ रुपये कमी वेतन मिळते - Divya Marathi
जास्त काम करूनही महिलांना प्रत्येक तासाला पुरुषांपेक्षा २६८ रुपये कमी वेतन मिळते

सिडनी -  जगभरातील महिला पुरुषांच्या तुलनेत प्रत्येक आठवड्यात ८ तास अधिक काम करतात, तर पुरुष कार्यालयांत महिलांच्या तुलनेत १० तास अधिक काम करतात. परंतु कार्यालयातून आल्यानंतर घरकामाची जबाबदारीही महिलांवरच असते. घरकामासाठी महिला पुरुषांच्या तुलनेत १८ तास अधिक वेळ देतात. घर आणि कार्यालयाच्या कामाला एकत्र केले तर महिला ८ तासांनी पुढे आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय विद्यापीठाच्या संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.   


प्रत्येकी १३ हजार महिला-पुरुषांचे सर्वेक्षण करण्यात आले. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा अधिक काम करूनही महिलांच्या कामाची उत्कृष्टता २ टक्क्यांनी जास्त आहे. तरीसुद्धा स्त्री-पुरुष वेतन असमानतेचा प्रश्न कायम आहे. महिलांना कामासाठी प्रत्येक तासाला पुरुषांपेक्षा ४ डॉलर म्हणजेच जवळपास २६८ रुपये कमी मिळत आहेत. 


अहवालानुसार, पुरुष प्रत्येक आठवड्यात कार्यालयासाठी ४४ तास आणि घरकामासाठी ३४ तास असा एकूण ७८ तासांचा वेळ देतात, तर महिला प्रत्येक आठवड्यात कार्यालयासाठी ३४ तास, घरकामासाठी ५२ तास म्हणजेच एकूण ८६ तासांचा वेळ देतात. दरदिवशी एका तासापेक्षा जास्त वेळेच्या अतिरिक्त कामांमुळे महिलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यांच्यात तणाव वाढत चालला आहे.

 

महिलांचे मानसिक आरोग्य गुणांकन पुरुषांपेक्षा २ पॉइंटने कमी आढळून आले आहे. 
महिला आणि पुरुषांनी किती काम करायला हवे यासंदर्भात अहवालात सांगण्यात आले आहे. पुरुषांनी दर आठवड्यात ४८ तास आणि महिलांनी ३२ तास काम करणे आवश्यक आहे. 

 

- पुरुष दर आठवड्यात कार्यालयात ४४ तास, घरकामास ३४ तास देतात.

- महिला आठवड्याला कार्यालयात ३४ तास व घरकामास ५२ तास वेळ देतात.

- महिलांना तुलनेत प्रतितास सरासरी २६८ रुपये कमी मिळतात.

- जगातील ६६ टक्के कामगार निर्धारित वेळेपेक्षा अधिक काम करत  

 

पुढील स्लाईडवर पहा व्यावसायिक वृत्तीत महिला, तर व्यवस्थापन क्षमतेत पुरुष पुढे 

बातम्या आणखी आहेत...