आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारने रेड टेपला रेड कार्पेटमध्ये बदलले! दावोसमध्ये माेदींचे 50 मिनिटे हिंदीत भाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दावोस- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक परिषदेच्या ४८ व्या वार्षिक बैठकीच्या उद््घाटनपर सत्राला संबोधित केले. हिंदीतून ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी हवामान बदल, दहशततवाद आणि आत्मकेंद्रित होणे ही जगापुढील तीन सर्वात मोठी आव्हाने असल्याचे प्रतिपादन केले. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी ४ उपायही सुचवले. भारत हे गुंतवणुकीसाठी जागतिक स्थळ असल्याचे सांगत मोदी म्हणाले, सरकारने रेड टेपला (लालफीतशाही) रेड कार्पेटमध्ये (लाल गालिचा) बदलले आहे. रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रसिद्ध वक्तव्याने त्यांनी भाषण संपवले.

 

माेदी म्हणाले 

- वैश्विक हवामान बदल, दहशतवाद व आत्मकेंद्रित होणे ही ३ मोठी आव्हाने
- सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे भारत गुंतवणुकीचे जागतिक डेस्टिनेशन
- जगातील राजकीय, आर्थिक व सुरक्षा संस्थांत सुधारणांचे आवाहन 

 

जगापुढील ३ आव्हाने 
हवामान बदल : कार्बन उत्सर्जन घटवा, असे सर्वच सांगतात. मात्र असे किती देश आहेत जे विकसनशील देशांना तंत्रज्ञान देण्यासाठी समोर येतात. 
दहशतवाद : दहशतवादापेक्षा त्यात केलेला गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट असा बनावट भेद अधिक धोकादायक आहे.  
आत्मकेंद्रित : अनेक समाज आणि देश जास्तीत जास्त आत्मकेंद्रित होत आहेत. अशा मनोवृत्ती आणि चुकीच्या प्राथमिकतांचे परिणाम हवामान बदल व दहशतवादाच्या धाेक्यापेक्षा कमी नाहीत.

 

अाव्हानांवर ४ उपाय 
सर्वांनी मतभेद मोडून समान आव्हानांविरुद्ध एकत्र येत काम करावे.
आंतरराष्ट्रीय कायदे व नियमांचे योग्य पालन व्हावे.
जगातील मुख्य राजकीय, आर्थिक व सुरक्षा संस्थांत सुधारणा व्हावी.
जगाच्या आर्थिक प्रगतीला चालना द्यावी लागेल.


महिलांची विक्रमी उपस्थिती 
- यावेळी समिटमध्ये प्रथमच 21% प्रतिनिधी महिला आहेत. हा एक विक्रम आहे. 
- प्रथमच सगळ्या को-चेअर महिला आहेत. त्यात भारताच्या आंत्रप्रिन्योर चेतना सिन्हा यांचाही समावेश आहे. 
- दावोसमधील ही 48वी परिषद आहे. त्यात 70 देशांच्या राष्ट्राध्यक्षांसह 3000 जण सहभागी झाले आहेत. परिषदेती थीम - 'विभाजीत जगासाठी एकत्रितपणे भविष्याची निर्मिती' अशी आहे. 
- सोमवारी मोदींनी स्वित्झरलंडचे राष्ट्रपती अॅलेन बर्सेटबरोबर चर्चा केली. 1997 मध्ये एचडी देवेगौडा आणि 1994 मध्ये नरसिंह राव या परिषदेत सहभागी झाले होते. 


2000 कंपन्यांच्या सीईओंची उपस्थिती 
- दावोस-2018 मध्ये डब्ल्यूटीओ, वर्ल्ड बँक, आयएमएफसह 38 संघटनांचे प्रमुख सहभागी होत आहेत. 2,000 कंपन्यांचे सीईओही उपस्थित आहेत. 
- मीटिंगमध्ये 400 सेशन असतील. त्यात 70 देशांच्या प्रमुखांसह 350 नेते सहभागी होतील. 
- दावोसमध्ये प्रथमच योगाचे आयोजन होत आहे. त्यात योगगुरू बाबा रामदेव यांचे दोन शिष्य योगा शिकवतील. 
- एक सेशन आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही संबोधित करतील. 
- पाकिस्तानचे पीएम शाहीद खाकान अब्बासी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगही सहभागी होतील. 


काय आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम?
- यह नॉन-गवर्नमेंटल ऑर्गनाइजेशन है, जो पब्लिक-प्राइवेट पार्टनरशिप के लिए व्यापार, राजनीति, शिक्षा, समाज से जुड़े लोगों की भागीदारी से दुनिया में सुधार के लिए कमिटेड है।
- वर्ल्ड इकोनॉमिक फोरमची स्थापना 1971 मध्ये जिनेव्हा युनिव्हर्सिटीचे प्रो. क्लॉज एम श्वाब यांनी केली होती. 

 

> हेही वाचा, मोदी जगातील 60 प्रमुख सीईओंना म्हणाले, भारत म्हणजे व्यवसाय! जगातील अव्वल सीईओंशी चर्चा...

बातम्या आणखी आहेत...