आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • मोदींच्या सन्मानासाठी झुकले हे जागतिक नेते, प्रोटोकॉल मोडून केले वेलकम World Leaders Breaks Protocol For PM Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींच्या सन्मानासाठी झुकले हे जागतिक नेते, प्रोटोकॉल मोडून केले वेलकम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्रायलचे पीएम नेतन्याहू यांनी मोदींसाठी 5 वेळा प्रोटोकॉल मोडला. - Divya Marathi
इस्रायलचे पीएम नेतन्याहू यांनी मोदींसाठी 5 वेळा प्रोटोकॉल मोडला.

इंटरनॅशनल डेस्क - पीएम नरेंद्र मोदींचा दोन दिवसांचा चीन दौरा शनिवारी संपत आहे. दरवेळी प्रमाणो या वेळचा त्यांचा दौराही जागतिक माध्यमांत चर्चिला गेला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आधी प्रोटोकॉल मोडून त्यांचे वेलकम केले आण्िा मग या दोन दिवसांच्या समिटमध्ये दोन्ही नेत्यांनी 6 वेळा भेट घेतली. तथापि, मोदींसाठी प्रोटोकॉल मोडणारे जिनपिंग एकमेव नेते नाहीत. यापूर्वीही अनेक जागतिक नेत्यांनी प्रोटोकॉल मोडून मोदींचे स्वागत केलेले आहे.

 

नेतन्याहू यांनी मोदींच्या सन्मानार्थ मोडले 5 प्रोटोकॉल
70 वर्षांत जेव्हा पहिल्यांदा भारतीय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी इस्रायलला गेले होते, तेव्हा तेथील पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकॉल मोडून त्यांचे स्वागत केले होते. नेतन्याहू यांनी मोदींच्या सन्मानार्थ एकदा नाही, तर 5 वेळा प्रोटोकॉल मोडला होता. असा सन्मान अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आणि पोप यांच्यानंतर फक्त भारतीय पंतप्रधानांना मिळाला होता. नेतन्याहू यांनी आपल्या कॅबिनेट मंत्र्यांसोबत स्वत: एअरपोर्टवर जाऊन मोदींचे स्वागत केले होते. शिवाय ते 12 कार्यक्रमांमध्ये त्यांच्यासोबत राहिले होते. त्यांनी मोदींसोबत दोन वेळा डीनर आणि दोन वेळा लंच केला होता आणि त्यांना निरोप द्यायलाही स्वत: एअरपोर्टवर गेले होते.

 

पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, अशाच 5 आणखी जागतिक नेत्यांबाबत, ज्यांनी मोदींसाठी मोडला प्रोटोकॉल... 

बातम्या आणखी आहेत...